आसामात पावसाचे 46 बळी ; पूरस्थितीमुळे 24 जिल्ह्यांतील 11 लाख नागरिकांना फटका

आसाममध्ये पूरस्थिती भयंकर झाली आहे. लाखो लोकांना स्थलांतर करावे लागत आहे. पुरातून सुटका करून घेण्यासाठी नागरिक प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. बजाली येथे केळीचा तराफा करून सुरक्षित ठिकाणी जाताना नागरिक.
आसाममध्ये पूरस्थिती भयंकर झाली आहे. लाखो लोकांना स्थलांतर करावे लागत आहे. पुरातून सुटका करून घेण्यासाठी नागरिक प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. बजाली येथे केळीचा तराफा करून सुरक्षित ठिकाणी जाताना नागरिक.

गुवाहाटी वृत्तसंस्था : ईशान्येकडील राज्यात पावसाचा कहर पाहायला मिळत असून सर्वाधिक फटका आसामला बसला आहे. गेले तीन दिवस सुरू असलेल्या पावसाने राज्यभरातील नद्यांची पाणी पातळी वाढली असून अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. यात दोन बालकांसह चौघांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यातील पूरस्थिती आणि भूस्खलनातील मृतांचा आकडा 46 वर गेला आहे.

आसाममध्ये गेल्या 3-4 दिवसांपासून तुफान पाऊस होत असून 25 जिल्ह्यातील 11 लाख नागरिकांना पूरस्थितीचा फटका बसला आहे. आसाम आणि मेघालयात अतिवृष्टीमुळे शाळा आणि महाविद्यालये शनिवारपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. शनिवारसाठी दोन्ही राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 61 हजार 498 नागरिकांनी शिबिरात आसरा घेतला आहे. अनेक रेल्वेगाड्या रद्द केल्या असून काहींचा मार्ग बदलला आहे.

नद्यांनी ओलांडली धोका पातळी

आसाममध्ये 24 जिल्ह्यांतील 11 लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. ब्रह्मपुत्रेची पाणीपातळी वाढत आहे. मानस, पगलादिया, पुथिमारी, कोपिली आणि गौरंगा या नद्या धोका पातळीवरून वाहत आहेत. काही धरणांतून विसर्ग सुरू झाला आहे. नदीकिनार्‍यावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे.

  • आसाम-मेघालयातमिळून 1700 गावेपाण्याखाली
  • आसाममध्ये19,782.80 हेक्टर शेतजमीन पाण्याखाली
  • अभिनेता अर्जुन कपूर, दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्याकडून मुख्यमंत्री मदत निधीस 5 लाख रु.
  • मेघालयात महामार्ग सहावर भूस्खलन, अनेक भागांचा संपर्क तुटला
  • चार मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली चार समित्यांची स्थापन

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news