File Photo
File Photo

आंतरधर्मीय विवाहितेवर गोळीबार

Published on

जयपूर : आंतरधर्मीय विवाहितेवर जयपूरमध्ये बुधवारी सकाळी दोघांनी गोळ्या झाडल्या. अंजली (वय 26) हिच्यावर ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. अंजलीचे पती अब्दुल लतीफ यांनी सांगितले की, माझ्या कुटुंबातील लोक आम्हाला त्रास देत होते. माझा एक नातेवाईक रियाझ खान यानेच अंजलीवर गोळी झाडली. 27 जुलै 2021 रोजी अंजलीचे व माझे लग्न झाले. तेव्हापासून माझा मोठा भाऊ अब्दुल लतीफ आणि त्याचा साथीदार रियाझ खान हे आम्हाला त्रास देत आहेत. आम्ही आधीही त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news