

नवी दिल्ली : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरून काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांची केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. अर्थव्यवस्था शानदार स्थितीत असल्याचे सरकार ठामपणे सांगू शकते काय? असा खोचक सवालही चिदंबरम यांनी सोशल मीडियाद्वारे उपस्थित केला आहे.
आर्थिक वर्ष 2022-23 साठी सरकारने 6.4 टक्के इतक्या वित्तीय तुटीचे लक्ष्य ठेवले होते, मात्र आता त्या उद्दिष्टापासून सरकार मागे सरत असल्याचा आरोप चिदंबरम यांनी केला. उच्च वित्तीय तूट, विदेशी गुंतवणुकदारांचा काढता पाय, इतर चलनांच्या तुलनेत रुपयाची घसरण, विदेशी चलन साठ्यात सातत्याने होत असलेली घट… या सगळ्याबद्दल सरकारने आपले म्हणणे मांडले पाहिजे, असेही चिदंबरम म्हणाले.
हेही वाचा