Yasin Malik affidavit : ‘विधवेसारखं जगू देणार नाही...’ : फुटीरतावादी नेता यासीन मलिकचा पत्नीला घटस्फोटाचा निर्णय

जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या मलिकने तुरुंगातून कुटुंबासाठी लिहिले पत्र

Yasin Malik divorce news
तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला काश्मिरी फुटीरतावादी नेता यासीन मलिक याने आपली पत्नी मुशाल हिला घटस्फोट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. File Photo
Published on
Updated on

Yasin Malik affidavit : तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला काश्मिरी फुटीरतावादी नेता यासीन मलिक याने आपली पत्नी मुशाल हिला घटस्फोट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दहशतवादशी संबंधित प्रकरणांमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या मलिकने तुरुंगातून आपल्या कुटुंबासाठी एक भावूक पत्र लिहिले आहे. जम्मुच्या टाडा/पोटा (TADA/POTA) न्यायालयात सादर केलेल्या २५ पानांच्या प्रतिज्ञापत्रात यासीनने पत्नी मुशाल व्यतिरिक्त आपली आई आणि १३ वर्षांची मुलगी रझिया सुलताना हिच्यासाठीही संदेश पाठवला आहे.

पत्‍नीने विधवेसारखे जीवन जगावे अशी माझी इच्छा नाही

प्रतिज्ञापत्रात यासीनने नमूद केले आहे की, गेल्या आठ वर्षांपासून त्याचा पत्नी मुशालशी कोणताही फोन किंवा व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क झालेला नाही. तुरुंगात असताना त्याला कुटुंबाशी संपर्क साधण्याची परवानगी मिळाली नव्हती. अत्यंत दुःखात हा निर्णय घेतल्याचे सांगत त्याने पत्रात लिहिले, "मुशालने तिचे संपूर्ण आयुष्य या परिस्थितीचे ओझे वाहत किंवा एका विधवेसारखे जगावे, अशी माझी इच्छा नाही. तिने सन्मानाने आणि आशेने आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करावी."


Yasin Malik divorce news
PNB Fake Currency Scam : 'पीएनबी'च्या 'करन्सी चेस्ट'मध्ये तब्बल १७ कोटींच्या बनावट नोटा आल्या कुठून? तपास यंत्रणा चक्रावल्या

फाशीच्या शिक्षेची भीती

यासीन मलिकला फाशीची शिक्षा होण्याची भीती आहे. प्रतिज्ञापत्रात त्याने आपल्याला फाशीची शिक्षा किंवा दीर्घकाळ तुरुंगवास होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळेच पत्नीला या अनिश्चितता आणि चिंतेच्या आयुष्यातून मुक्त करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्याने म्हटले आहे.


Yasin Malik divorce news
Disha Salian Death Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे : मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

मुलीने दिला जीवन संपविण्‍याचा इशारा

आपली १३ वर्षांची मुलगी रझिया सुलतानाला त्याने आजीची काळजी घेण्याचा आणि दररोज किमान पाच मिनिटे तिच्याशी बोलण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, हे प्रतिज्ञापत्र समोर आल्यानंतर रझिया सुलतानाने अत्यंत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. तिने एक व्हिडिओ जारी करत, "जर वडिलांनी खरंच आईला घटस्फोट दिला, तर मी माझे आयुष्य संपवेन," असा इशारा दिला आहे.


Yasin Malik divorce news
Misbah ul Haq : पाकिस्‍तान क्रिकेटला आणखी एक धक्‍का; मिसबाह-उल-हकने दिला निवड समिती सदस्यपदाचा राजीनामा

यासीम मलिक २०१९ पासून तिहार तुरुंगात कैद

यासीन मलिक २०१९ पासून टेरर फंडिंग प्रकरणी तिहार तुरुंगात बंद आहे. मे २०२२ मध्ये एनआयएच्या (NIA) विशेष न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, एनआयएने या शिक्षेचे फाशीत रुपांतर करण्याची मागणी न्यायालयात केली आहे. सध्या जम्मूमध्ये त्याच्यावर एका हत्या प्रकरणाचा खटलाही सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news