PNB Fake Currency Scam : 'पीएनबी'च्या 'करन्सी चेस्ट'मध्ये तब्बल १७ कोटींच्या बनावट नोटा आल्या कुठून? तपास यंत्रणा चक्रावल्या

रिझर्व्ह बँक आणि पोलिसांच्या पथकांकडून सखोल तपासाला सुरुवात
PNB Fake Currency Scam
प्रतिकात्‍मक छायाचित्र. File Photo
Published on
Updated on

PNB Fake Currency Scam : उत्तर प्रदेशातील सहारणपूर येथील पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) करन्सी चेस्टमध्ये तब्बल १७ कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या बनावट नोटा आढळल्याने बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रिझर्व्ह बँक (RBI) आणि पोलिसांच्या पथकांनी मंगळवारी उशिरापर्यंत बँकेत झाडाझडती घेत सखोल तपास सुरू केला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा थेट करन्सी चेस्टपर्यंत पोहोचल्या की वेगवेगळ्या टप्प्यांवर बँकिंग चॅनेलद्वारे जमा झाल्या, याचा शोध सध्या तपास यंत्रणा घेत आहेत.

करन्सी चेस्टच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह

सामान्यतः करन्सी चेस्टमध्ये रोख रक्कम स्वीकारणे, मोजणे आणि पडताळणी अशी एक निश्चित प्रक्रिया असते. त्यानंतरच नोटांचे बंडल बनवून नोंदी ठेवल्या जातात. अशा परिस्थितीत कोट्यवधींच्या बनावट नोटा चेस्टमध्ये पोहोचल्याने बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. या संशयास्पद नोटा कोणत्या तारखेला आल्या, त्यांचा बंडल नंबर काय होता, त्या कोणत्या शाखेतून आल्या, त्या कोणत्या कर्मचाऱ्याने स्वीकारल्या आणि कोणत्या अधिकाऱ्याने त्यांची पडताळणी केली, या सर्व कागदपत्रांची आणि रजिस्टरची कसून तपासणी सुरू आहे.

PNB Fake Currency Scam
Crime News | भयंकर..! अत्याचार करून नर्सची हत्या अन् नराधम थेट गॅरेजमध्ये जाऊन झोपला!

इतर शाखांवरही संशयाची सुई

ह्या बनावट नोटा इतर कोणत्याही शाखेतून किंवा करन्सी चेस्टमधून आल्या असण्याची शक्यता असून, तसे स्पष्ट झाल्यास तपासाची व्याप्ती सहारणपूरबाहेरही वाढू शकते. नोटा ओळखणाऱ्या मशिनरी आणि मानक प्रक्रियेत काही त्रुटी होत्या का, हेही तपासले जात आहे. याप्रकरणी तीन बँक अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद आढळल्याने त्यांच्यावर आधीच कारवाई करण्यात आली आहे.

PNB Fake Currency Scam
Subhash Chandra : सुभाष चंद्रांना NCLTचा दणका; ६.२५ कोटींच्या 'लोन सेटलमेंट प्लॅन'ला स्थगिती

प्रकार कसा उघडकीस आला?

हा प्रकार केवळ बनावट नोटा जप्त करण्यापुरता मर्यादित नाही. सुमारे ११.५० कोटी रुपयांची रोख रक्कम आरबीआयच्या जयपूर कार्यालयात पाठवल्यानंतर केवळ ४.३० लाख रुपयांची तूट समोर आली होती. या छोट्याशा तुटीचा तपास करत असताना करन्सी चेस्टमध्ये सुमारे ७.४० कोटींच्या बनावट नोटा सापडल्या. त्यानंतर तपासाचा धागादोरा पुढे नेला असता हा घोटाळा तब्बल १७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला.

PNB Fake Currency Scam
Misbah ul Haq : पाकिस्‍तान क्रिकेटला आणखी एक धक्‍का; मिसबाह-उल-हकने दिला निवड समिती सदस्यपदाचा राजीनामा

आरबीआयच्या २१ सदस्यांच्या पथकाकडून तपासणी

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरबीआय आणि पीएनबीच्या २१ सदस्यांच्या संयुक्त पथकाने मंगळवारी सहारणपूरमध्ये सलग आठ तास तपास केला. बनावट नोटांचा मुख्य स्रोत आणि बँकिंग चॅनेलमधील त्यांचा प्रवास शोधण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, तपासाची चक्रे जलद गतीने फिरवत संशयित आरोपींची बँक खाती सील करण्यात आली असून, हरियाणापर्यंत चौकशीचे धागेदोरे गेले आहेत, असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

logo
Pudhari News
pudhari.news