worlds richest Indian CEO : सत्या नडेला किंवा सुंदर पिचाई नव्हे; जयश्री उल्लाल ठरल्या सर्वात श्रीमंत भारतीय 'सीईओ'!

उल्‍लाला यांच्‍या 'अरिस्टा नेटवर्क्स'चा महसुलात मागील वर्षाच्‍या तुलनेत झाली २० टक्‍क्‍यांनी वाढ
worlds richest Indian CEO : सत्या नडेला किंवा सुंदर पिचाई नव्हे; जयश्री उल्लाल ठरल्या सर्वात श्रीमंत भारतीय 'सीईओ'!
Published on
Updated on
Summary

जयश्री उल्लाल २००८ पासून 'अरिस्टा नेटवर्क्स' या संगणक नेटवर्किंग कंपनीच्या अध्यक्ष आणि सीईओ आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने २०२४ मध्ये ७ अब्ज डॉलर्सचा महसूल नोंदवला आहे.

worlds richest Indian CEO

नवी दिल्‍ली : मागील अनेक वर्षांपासून जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात श्रीमंत भारतीय वंशाचे सीईओ म्‍हटलं की, सत्या नडेला आणि सुंदर पिचाई यांची नावे घेतली जातात. दोघेही जगातील दोन सर्वात प्रभावशाली कंपन्या चालवतात. मात्र, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 'हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२५' (Hurun India Rich List 2025) मध्‍ये दोन्‍ही दिग्गजांना मागे टाकत 'अरिस्टा नेटवर्क्स'च्या (Arista Networks) सीईओ जयश्री उल्लाल यांनी अव्वल स्थान पटकावले आहे. उल्लाल आता जगातील सर्वात श्रीमंत भारतीय व्यावसायिक व्यवस्थापक ठरल्या आहेत.

संपत्तीचा आकडा थक्क करणारा

एका रिपोर्टनुसार, जयश्री उल्लाल यांची एकूण संपत्ती ५०,१७० कोटी रुपये इतकी आहे. त्यांच्या तुलनेत सत्या नडेला यांची संपत्ती ९,७७० कोटी रुपये असून ते दुसऱ्या स्थानी आहेत, तर सुंदर पिचाई ५,८१० कोटी रुपयांसह सातव्या क्रमांकावर आहेत. सिलिकॉन व्हॅलीतील आपल्या समकालीनांना उल्लाल यांनी मोठ्या फरकाने मागे टाकले आहे. जयश्री उल्लाल २००८ पासून 'अरिस्टा नेटवर्क्स' या संगणक नेटवर्किंग कंपनीच्या अध्यक्ष आणि सीईओ पदाची धुरा सांभाळत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने २०२४ मध्ये ७ अब्ज डॉलर्सचा महसूल नोंदवला, जो मागील वर्षाच्या तुलनेत २० टक्क्यांनी अधिक आहे. अरिस्टा नेटवर्क्समध्ये त्यांची ३ टक्के भागीदारी असून, यातील काही हिस्सा त्यांनी आपल्या दोन मुलांसह भाची आणि पुतण्यासाठी राखून ठेवण्यात आला आहे.

worlds richest Indian CEO : सत्या नडेला किंवा सुंदर पिचाई नव्हे; जयश्री उल्लाल ठरल्या सर्वात श्रीमंत भारतीय 'सीईओ'!
AI vs Employees : AI कर्मचाऱ्यांची जागा घेणार का? AWS चे CEO मॅट गारमन यांनी दिले उत्तर

कोण आहेत जयश्री उल्‍लाल?

उल्लाल यांचा जन्म २७ मार्च १९६१ रोजी लंडनमध्ये एका भारतीय हिंदू कुटुंबात झाला. वयाच्या पाचव्या वर्षी त्या भारतात आल्या. त्यांचे वडील भौतिकशास्त्रज्ञ होते आणि त्यांनी आयआयटी (IIT) संस्थांच्या उभारणीत महत्त्वाचे योगदान दिले होते. उल्लाल यांचे प्राथमिक शिक्षण दिल्लीतील 'कॉन्व्हेंट ऑफ जीझस अँड मेरी' येथे झाले. त्यानंतर वडिलांच्या नोकरीनिमित्त त्या सॅन फ्रान्सिस्कोला स्थायिक झाल्या. त्यांनी सॅन फ्रान्सिस्को स्टेट युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी आणि सांता क्लारा युनिव्हर्सिटीमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. २०२५ मध्ये त्यांना अभियांत्रिकी क्षेत्रातील मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले आहे.

worlds richest Indian CEO : सत्या नडेला किंवा सुंदर पिचाई नव्हे; जयश्री उल्लाल ठरल्या सर्वात श्रीमंत भारतीय 'सीईओ'!
Viral Story : ब्रेकअप झालाय, मला ब्रेक हवाय; Gen Z कर्मचाऱ्याचा थेट CEO ना ईमेल, स्क्रीनशॉट व्हायरल

'अरिस्टा नेटवर्क्स'ची प्रगती लक्षणीय

करिअरच्या सुरुवातीला त्यांनी 'एएमडी' सारख्या दिग्गज कंपन्यांमध्ये काम केले. १९९३ मध्ये त्यांनी काम करत असलेली 'क्रॅसेन्डो कम्युनिकेशन्स'कंपनी सिस्कोने (Cisco) विकत घेतली.यानंतर त्यांच्या यशाचा आलेख लक्षणीयरित्‍या उंचावला. २००८ मध्ये त्या अरिस्टा नेटवर्क्समध्ये रुजू झाल्या. त्यावेळी कंपनीत केवळ ३० पेक्षा कमी कर्मचारी होते आणि एका लॉ फर्मच्या तळघरातून काम चालायचे. आज त्यांच्या मेहनतीमुळे ही कंपनी क्लाउड नेटवर्किंग क्षेत्रातील एक जागतिक नाव बनली आहे.जयश्री उल्लाल यांची एकूण संपत्ती ५०,१७० कोटी रुपये आहे, ज्यामुळे त्या सिलिकॉन व्हॅलीतील उच्च-प्रसिद्ध समकालीन व्यक्तींच्या पुढे आहेत.

worlds richest Indian CEO : सत्या नडेला किंवा सुंदर पिचाई नव्हे; जयश्री उल्लाल ठरल्या सर्वात श्रीमंत भारतीय 'सीईओ'!
Apple : अमेरिकेत विकले जाणारे बहुतेक iPhones 'मेड इन इंडिया'; ॲपलचे CEO टीम कुक यांचा मोठा खुलासा

कंपनीचा महसूल सुमारे २० टक्‍क्‍यांनी वाढला

ब्लूमबर्गच्‍या माहितीनूसार, ल्लाल २००८ पासून अरिस्टा नेटवर्क्स या संगणक नेटवर्किंग कंपनीचे नेतृत्व करत आहेत. फोर्ब्सच्या मते, त्यांच्या नेतृत्वाखाली, या सार्वजनिकरित्या सूचीबद्ध कंपनीने २०२४ मध्ये ७ अब्ज डॉलर्सचा महसूल नोंदवला, जो मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास २० टक्क्यांनी वाढला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news