Women Scheme: महिलांना सरकारी योजनेतून मिळणार गॅरंटीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज; अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस

Udyogini Yojana: देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी अनेक योजना कार्यान्वित आहेत. कोणत्याही गॅरंटीशिवाय महिलांना सहज कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या या योजनेबाबत जाणून घ्या.
Women Scheme
Women Schemefile photo
Published on
Updated on

Women Scheme Udyogini Yojana

नवी दिल्ली : आजच्या काळात अनेक महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो, पण अनेकदा पैशांची कमतरतेमुळे अडथळे येतात. या पार्श्वभूमीवर, देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी अनेक योजना कार्यान्वित आहेत. यापैकीच एक आहे उद्योगिनी योजना.

ही काही नवीन योजना नाही, तर केंद्र आणि अनेक राज्य सरकारे बऱ्याच काळापासून ही योजना चालवत आहेत. व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांना कोणत्याही गॅरंटीशिवाय सहज कर्ज उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश आहे.

Women Scheme
Bank Deposit Rules: बँक बुडाली तर तुमचे पैसे कसे मिळणार? RBI ने नियम बदलले, जाणून घ्या सविस्तर

उद्योगिनी योजना काय आहे?

उद्योगिनी योजनेची सुरुवात सर्वात आधी कर्नाटक सरकारने केली होती, पण आज ती अनेक राज्यांच्या आणि केंद्राच्या मदतीने देशभरातील महिलांना लाभ देत आहे. या योजनेअंतर्गत महिलांना १ लाख ते ३ लाख रुपयांपर्यंतचे तारण-मुक्त कर्ज दिले जाते. याचा अर्थ, कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची सुरक्षा किंवा गॅरंटी द्यावी लागत नाही. या रकमेतून महिला ब्युटी पार्लर, शिलाई केंद्र, किराणा दुकान, डेअरी किंवा कोणताही छोटा व्यवसाय सहजपणे सुरू करू शकतात.

काय आहे पात्रता?

  • उद्योगिनी योजनेत अर्ज करण्यासाठी काही मूलभूत अटी ठेवण्यात आल्या आहेत:

  • १८ ते ५५ वर्षांदरम्यानच्या महिला अर्ज करू शकतात.

  • महिलेने यापूर्वी कोणत्याही कर्जामध्ये थकबाकी केलेली नसावी.

  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

  • विधवा किंवा दिव्यांग महिलांसाठी उत्पन्नाची मर्यादा लागू होत नाही, म्हणजेच त्या थेट अर्ज करू शकतात.

Women Scheme
UPI Credit Line: खात्यात पैसे नसले तरीही पेमेंट करता येणार! काय आहे 'UPI क्रेडिट लाइन'? तुम्हाला कसा होईल फायदा?

अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड

  • पासपोर्ट आकाराचा फोटो

  • उत्पन्नाचा दाखला

  • व्यवसाय योजना

  • जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)

  • अनुभव किंवा प्रशिक्षण प्रमाणपत्र (असल्यास)

अर्ज कसा करावा?

अर्ज करणे खूप सोपे आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेत जाऊन अर्ज करू शकता. याशिवाय, सरकारच्या myscheme.gov.in पोर्टलवर देखील ऑनलाइन अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. यापूर्वी ही योजना केवळ कर्नाटकच्या महिलांपुरती मर्यादित होती, पण आता देशभरातील महिला याचा लाभ घेऊ शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news