Kerala Election: राहुल गांधी आसाम आणि बंगालऐवजी केरळवर लक्ष केंद्रित का करत आहेत? यामागचं राजकीय गणित काय आहे?

Rahul Gandhi Kerala Election Strategy: काँग्रेसने आसाम आणि बंगालऐवजी केरळवर मुख्य लक्ष केंद्रित केलं आहे. थेट लढत, सत्तांतराची शक्यता आणि गांधी कुटुंबाचं कनेक्शन हे यामागील मुख्य कारणं आहेत.
Rahul Gandhi
Rahul Gandhi Pudhari
Published on
Updated on

Rahul Gandhi Kerala Election Strategy: भारताच्या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत असताना, काँग्रेसचा मुख्य फोकस मात्र केरळवर असल्याचं स्पष्ट दिसत आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते फक्त केरळमध्येच आक्रमक प्रचार करताना दिसत आहेत. प्रश्न असा आहे की, आसाम आणि बंगालसारखी महत्त्वाची राज्यं सोडून काँग्रेसचं केरळवर एवढं लक्ष का आहे?

1. केरळमध्ये थेट लढत – काँग्रेससाठी संधी

केरळ हे एकमेव राज्य आहे जिथे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (UDF) आणि डाव्या आघाडीतील लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट (LDF) यांच्यात थेट सामना आहे.
बंगालमध्ये ममता बॅनर्जी विरुद्ध भाजप, तर तामिळनाडूत DMK-AIADMK अशी वेगळी समीकरणं आहेत. त्यामुळे काँग्रेसला जिंकण्याची खरी संधी केरळमध्येच आहे.

2. सत्तांतराची परंपरा – काँग्रेसला मोठी आशा

केरळमध्ये दर पाच वर्षांनी सत्ता बदलते. मात्र पिनाराई विजयन यांनी 2021 मध्ये ही परंपरा मोडली. आता 10 वर्षांच्या सत्तेनंतर ‘अँटी-इन्कम्बन्सी’चा फायदा काँग्रेसला मिळेल, अशी अपेक्षा पक्षाला आहे.

3. गांधी कुटुंबाचं केरळ कनेक्शन

वायनाड हा केवळ मतदारसंघ नाही, तर गांधी कुटुंबासाठी राजकीय आधार आहे. राहुल गांधी वायनाडमधून खासदार (2019–2024) झाले होते, तर प्रियंका गांधी सध्या याच ठिकाणाहून लोकसभा सदस्य आहेत. अमेठीतील पराभवानंतर वायनाडने राहुल गांधींना राजकीय आधार दिला.

4. काँग्रेससाठी 'करो या मरो'

जर काँग्रेस 2026 मध्ये पुन्हा पराभूत झाली, तर केरळमधील संघटनात्मक ताकद कोसळू शकते. स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला (UDF) मिळालेल्या यशामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. पण तो विधानसभा निवडणुकीत टिकवणं अत्यावश्यक आहे.

5. या मुद्द्यांवर आक्रमक रणनीती

काँग्रेसने विजयन सरकारविरोधात अनेक मुद्दे उचलले आहेत —

  • वाढतं कर्ज

  • बेरोजगारी

  • सोन्याची तस्करी

  • आपत्ती व्यवस्थापनातील त्रुटी

हे मुद्दे जनतेपर्यंत पोहोचवून ‘बदलाची गरज’ अधोरेखित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Rahul Gandhi
Jammu Kashmir Assembly clash | जम्मू-काश्मीर विधानसभेत इराण युद्धावरून धक्काबुक्की

6. पिढीगत बदल vs अनुभवी नेतृत्व

81 वर्षांचे पिनाराई विजयन हे अनुभवी नेते असले तरी काँग्रेस “युवा नेतृत्व” पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहे. राजकारणात ‘नवीन चेहरे vs जुनी पिढी’ असा संघर्षही या निवडणुकीत पाहायला मिळतोय.

7. मुस्लिम-ख्रिश्चन समीकरण गेमचेंजर ठरणार

केरळमध्ये मुस्लिम (27%) आणि ख्रिश्चन (18%) मिळून जवळपास 45% मतदार आहेत.
हे मतदार पारंपरिकपणे काँग्रेसच्या UDF कडे झुकलेले असतात. जर हे समीकरण योग्य बसलं, तर काँग्रेससाठी विजयाची दारं उघडू शकतात.

8. डिजिटल आणि ग्राउंड कॅम्पेनचा वापर

केरळमध्ये राहुल गांधींची प्रचारशैलीही बदलली आहे. ते केवळ सभांपुरते मर्यादित न राहता लोकांमध्ये मिसळून संवाद साधताना दिसत आहेत. यामुळे मतदार आकर्षित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

केरळ ही काँग्रेससाठी केवळ एक निवडणूक नाही तर ती पक्षाच्या भविष्यासाठीची निर्णायक लढाई आहे. राजकीय समीकरणं, भावनिक कनेक्शन आणि सत्तेची संधी... या तिन्ही गोष्टी एकत्रित आल्यामुळे राहुल गांधींनी केरळला प्राधान्य दिल्याचं दिसतं आहे. त्यामुळे केरळची निवडणूक कोण जिंकणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news