

जम्मू : जम्मू-काश्मीर विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीच्या आमदारांनी इस्रायलविरोधी घोषणा दिल्या. काही आमदारांनी इराणच्या समर्थनार्थ बॅनर आणि पोस्टरही फडकावले.
* इस्रायल, अमेरिकेविरोधात घोषणाबाजी
* कामकाज स्थगित
* खामेनींचे पोस्टर झळकावले
भाजप आमदारांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणा दिल्या. जम्मूसाठी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या मागण्या मांडल्या. ‘अमेरिका हाय-हाय’ घोषणाही ऐकू आल्या. गोंधळ वाढल्याने 20 ते 25 मिनिटांतच कामकाज अर्ध्या तासासाठी स्थगित करावे लागले. काँग्रेस आमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणा दिल्यानंतर भाजप आमदारांनी राहुल गांधींना पप्पू असे संबोधत आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याने वातावरण चिघळले. दोन्ही बाजूंचे आमदार आमनेसामने येत धक्काबुक्कीपर्यंत परिस्थिती पोहोचली. गोंधळ नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून मार्शल्स आणि सुरक्षारक्षकांना हस्तक्षेप करावा लागला, अन्यथा हातघाईची शक्यता निर्माण झाली होती.