

Why flight attendants tie water bottle wrappers to caps :
सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात एक एअर होस्टेस पाण्याची बॉटलचे रॅपर काढून ते झाकण्याच्या खालच्या बाजूला बांधताना दिसत आहे. बॉटलवरचे रॅपर काढून त्याची गाठ झाकण्याच्या इथं बांधली जात आहे. व्हिडिओमध्ये या ट्रिकबाबत अनेक दावा केले आहेत. काहीजण केबिन प्रेशरमुळे पाणी बाहेर येऊ नये म्हणून असं केल्याचं सांगत आहेत.
मात्र यामागे काही मोठी गोष्ट नाहीये. पाण्याच्या बॉटलचे रॅपर काढून ते झाकणाला लावण्याने असं काही मोठं काहीतरी होतंय असं देखील नाहीये. ही ट्रिक क्रू मेंबर आपल्या सोयीसाठी वापरतात.
एअर होस्टेसला वेगाने सर्व्हिस द्यावी लागलते. त्यावेळी त्यांना ओपन केलेली बॉटल आणि सील पॅक बॉटल यांच्यातील फरक समजावा यासाठी त्या वापरलेल्या बॉटलचे रॅपर काढून ते टोपणाला बांधतात. पाण्याचे वाटप लवकर आणि सहजरित्या करता यावे यासाठी त्या ही ट्रिक वापरतात. जर ही ट्रिक वापरली नाही तर विमानत सीलबंद बॉटल आणि उघडलेली बॉटल लगचेच ओळखणे कठिण जाते. सतत पाण्याच्या बॉटलचे झाकण काढावा लागू शकते.
डोळ्याला चटकन दिसावी यासाठी
गाठ मारलेली बॉटल डोळ्याला चटकन दिसते. त्यामुळे ही बॉटल आधीच उघडली होती हे कळतं. त्यामुळं पाणी सर्व्ह करताना गोंधळ उडत नाही.
तसेत कॅपच्या भोवती प्लास्टिक सील काढण्यासाठी तसेच फिरवण्यासाठी या गाठीचा वापर चांगल्या पकडीसाठी केला जातो. त्यामुळे बाटलीचे झाकण लवकर उघडण्यास देखील मदत मिळते.
तसेच तर बॉटल हातातून सटकू नये म्हणून ती पकडण्यासाठी देखील या बांधलेल्या रॅपरचा वापर होऊ शकतो. फ्लाईटच्यावेळी वेळ वाचवण्यासाठीची ही एक प्रॅक्टिकल ट्रिक आहे. ही ट्रिक काही नियम नाहीये. सर्वांनीच असं करायला पाहिजे असं काही नाही.