Viral Story: अंघोळीला गेली अन् १.३ लाखाचं बिल घेऊन आली... पाच मिनिटे गरम पाण्याचा शॉवर पडला महागात

Viral Story
Viral Storypudhari
Published on
Updated on

Viral Story Hot Shower Triggers Fire Alarm: ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या एका भारतीय महिलेसोबत एक अजब प्रकार घडला. असं घडेल याची कोणाला कल्पनाच नव्हती. महिलेने दावा केला आहे की तिने फक्त पाच मिनिटे गरम पाण्याने अंघोळ केली. मात्र बाहेर आल्यावर बिल्डिंगचा फायर अलार्म वाजत होता. नंतर तिला या फायर अलार्मचे जवळपास १८०० ऑस्ट्रेलियन डॉलर बिल द्यावं लागलं. याची भारतीय पैशात १.३ लाख रूपये किंमत आहे.

इन्स्टाग्राम व्हिडिओ व्हायरल

याबाबतचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओनुसार या महिलेला थंडी वाजत होती म्हणून तिने बाथरूमचा एक्झॉस्ट फॅन ऑन केला नाही. ती जवळपास पाच मिनिटे गरम पाण्याने अंघोळ करत होती. त्यानंतर अचानक बल्डिंगचा फायर अलार्म वाजला.

तिला वाटलं की कोणते तरी फायर ड्रील असेल. मात्र त्याचवेळी बिल्डिंगचा मॅनेजर तिच्या अपार्टमेंटमध्ये पोहचला. त्यानंतर लक्षात आलं की हा फायर अलार्म हा ज्या बाथरूममध्ये ती महिला अंघोळ करत होती त्यातून निघणाऱ्या वाफेमुळे वाजला होता. विशेष म्हणजे बाथरूमच्या एवढ्या जवळ कोणी फायर अलार्म कसा काय लावू शकतो असे अश्चर्य देखील या महिलेने व्यक्त केले.

पाच मिनिटाच्या शॉवरची १.३ लाख किंमत

महिलेला काही वेळातच मोठा धक्का बसला. महिलेला या घटनेनंतर १८०० ऑस्ट्रेलियन डॉलरचा चार्ज लावण्यात आला. हे बिल फायर सर्व्हिस घटनास्थळी पोहचण्याचा खर्च म्हणून लावण्यात आलं होतं. म्हणजे पाच मिनिटाच्या शॉवरसाठी या महिलेने १.३ लाख रूपये मोजले.

यानंतर याबाबत सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. बाथरूममधून येणाऱ्या वाफेमुळे फायर अलार्म वाजला पाहिजे का असा देखील प्रश्न लोक विचारत आहेत.

वाफेमुळे अलार्म वाजलाच कसा?

एका युजरने लिहिले की, मी देखील अशी स्थितीत राहिलो आहे. हे बिल देण्यास नकार द्या. शॉवरच्या वाफेमुळे फायर अलार्म वाजला नाही पाहिजे. याचा अर्थ अलार्म खूपच संवेदनशील आहे.'

दुसऱ्या एका युजरने, ही घटना पहिल्यांदाच घडली असेल तर चार्जेस घेऊ नये. तर एकाने असं झालं कसं गरम पाण्याच्या वाफेमुळे अलार्म कसा वाजू शकतो. तुम्ही त्या अलार्मची तपासणी करण्यास सांगायला हवं. यात तुमची काही चूक नाहीये.

सध्याच्या घडीला वाफेमुळे अलार्म वाजणे आणि लाखोंचे बिल फाटणे याबाबतचे तांत्रिक माहिती मिळालेली नसल्यामुळे याची पुष्टी होऊ शकलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news