

Why did Bikewala Couple quit social media?
मुंबई : सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेल्या इन्फ्लुएन्सर दाम्पत्याची शेवटची पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. अश्विन आणि प्रियांका (Ashwin priyanka) असे या दाम्पत्याचे नाव आहे. Bikewala couple या नावाने हे दाम्पत्य सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. त्यांनी अचानक मोठा निर्णय घेत सोशल मीडियाला अलविदा केला आहे.
''तुम्ही आजवर दिलेल्या प्रेमासाठी आम्ही प्रचंड आभारी आहोत. अखेरचा नमस्कार! कसलाही गैरसमज करून घेऊ नका. आम्ही संपूर्ण कुटुंबाने ठरवून हा निर्णय घेतला आहे. आम्ही सगळे मजेत आहोत आणि एकमेकांच्या सोबत आहोत.'' असे बाईकवाला कपलने बुधवारी (दि.२ जुलै) इन्स्ट्राग्रामवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
''नमस्कार, प्रत्येक गोष्टीला एक शेवट असतो आणि तो शेवट तुम्ही ठरवून केलात तर तो जास्त आनंददायी ठरतो. तुम्ही आजवर दिलेल्या प्रेमाबद्दल तुमचे खूप खूप आभार. यापुढे काय? हा प्रश्न माझ्याही समोर आहे. पण सापडले त्याचही उत्तर...Instagram, YouTube वरची ही शेवटची पोस्ट. शेवटी एवढंच माणूसच माणसाच्या कामी येणार आहे. त्यामुळे नाती जपा, टिकवा, वाढवा आणि समृद्ध करा,'' असा सल्ला त्यांनी यूजर्संना दिला आहे.
या दाम्पत्याचे इन्स्टाग्राम आणि युट्यूबर १ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांच्या इन्स्टाग्रामवर 858 पोस्ट्स आहेत. तर YouTube वर त्यांचे 455 videos आहेत. 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' अशी या इन्स्टाग्राम हँडलची टॅगलाईन आहे.