IPS Ajay Pal: आयपीएस अधिकाऱ्याचा नर्तकीसोबतचा व्हिडिओ व्हायरल, राजकारणात खळबळ; प्रकरण नेमकं काय?

Ajay Pal Sharma Bengal Controversy: अजय पाल शर्मा हे उत्तर प्रदेश कॅडरचे IPS अधिकारी असून कठोर कारवाईसाठी प्रसिद्ध आहेत. तृणमूलशी संबंधित लोकांना दिलेल्या इशाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ते चर्चेत आले.
Ajay Pal Sharma Bengal Controversy
Ajay Pal Sharma Bengal ControversyPudhari
Published on
Updated on

Ajay Pal Sharma Bengal Controversy: पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचं वातावरण तापलं आहे. यातच एका आयपीएस अधिकाऱ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. उत्तर प्रदेशातील ‘सिंघम’ म्हणून ओळखले जाणारे अजय पाल शर्मा हे आता बंगालच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत.

एका बाजूला तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना त्यांनी दिलेल्या कठोर इशाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल झाला, तर दुसऱ्या बाजूला महुआ मोइत्रा यांनी शेअर केलेल्या कथित डान्स व्हिडीओमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या दोन घटनांमुळे बंगालच्या निवडणुकीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना नवं वळण मिळालं आहे.

कोण आहेत अजय पाल शर्मा?

२०११ बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले अजय पाल शर्मा हे उत्तर प्रदेश कॅडरचे अधिकारी आहेत. कठोर कारवाई आणि गुन्हेगारांविरोधातील आक्रमक भूमिकेमुळे त्यांना ‘यूपी सिंघम’ अशी ओळख मिळाली. जौनपूरचे एसपी असताना त्यांनी तब्बल १३६ एन्काऊंटर केल्याची चर्चा होती. त्यामुळे उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी जगतात त्यांची मोठी दहशत आहे.

सध्या ते प्रयागराजमध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) म्हणून कार्यरत आहेत. पश्चिम बंगालमधील निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने त्यांची पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांना दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात पाठवण्यात आलं, जो अभिषेक बॅनर्जी यांचा प्रभाव असलेला भाग मानला जातो.

तृणमूल उमेदवाराला दिला इशारा

वादाची सुरुवात एका व्हिडीओपासून झाली. या व्हिडीओमध्ये अजय पाल शर्मा तृणमूल काँग्रेसचे फाल्टा मतदारसंघातील उमेदवार जहांगीर खान यांच्या कुटुंबीयांना आणि समर्थकांना कठोर शब्दांत इशारा देताना दिसले.

Ajay Pal Sharma Bengal Controversy
Rahul Gandhi vs Mamata Banerjee : राहुल गांधी ममता बॅनर्जींवर भडकले, म्हणाले; ‘बंगालमध्ये तृणमूलचे गुंडाराज!’

स्थानिकांकडून मतदानादरम्यान मतदारांना धमकावल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर शर्मा थेट जहांगीर खान यांच्या कार्यालयात पोहोचले होते. केंद्रीय सुरक्षा दलांसोबत त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, जर कुणी मतदारांना त्रास देण्याचा किंवा वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला, तर कठोर कारवाई केली जाईल.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच राजकीय वातावरण तापलं. तृणमूल काँग्रेसने आरोप केला की शर्मा हे भाजपाच्या दबावाखाली काम करत आहेत. तर अखिलेश यादव यांनी त्यांना भाजपाचा “एजंट” म्हटलं.

भाजपाचा पलटवार

दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने अजय पाल शर्मा यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत त्यांचं समर्थन केलं. पक्षाने दावा केला की बंगालमध्ये यावेळी “मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक” होणार असून गोंधळ घालणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

महुआ मोइत्रांचा आरोप

दरम्यान, तृणमूल खासदार महुआ मोइत्रा यांनी आणखी एक व्हिडीओ शेअर करत खळबळ उडवली. या कथित व्हिडीओमध्ये रंगीबेरंगी लाईट्समध्ये एक व्यक्ती डान्स करताना दिसत आहे. महुआ मोइत्रा यांनी दावा केला की हा व्यक्ती अजय पाल शर्मा आहे. त्यांनी सोशल मीडियावर उपरोधिक भाषेत “फेअर अँड लव्हली बाबुआ” असा उल्लेख करत त्यांच्यावर निशाणा साधला.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर नवी चर्चा सुरू झाली. काही जणांनी हा अधिकाऱ्याचा वैयक्तिक प्रश्न असल्याचं म्हटलं, तर काहींनी सार्वजनिक पदावर असलेल्या अधिकाऱ्याच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

Ajay Pal Sharma Bengal Controversy
Gujarat Election Results: गुजरातमध्ये अयोध्यासारखं कांड! निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का देत आपने फडकवला झेंडा

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तणाव वाढला

पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत असताना हा वाद अधिकच पेटला आहे. निवडणूक आयोगाने पाठवलेल्या अधिकाऱ्यांवर पक्षपातीपणाचे आरोप होत आहेत, तर विरोधी पक्षांकडून तृणमूलवर मतदारांना धमकावल्याचे आरोप केले जात आहेत.

या संपूर्ण प्रकरणामुळे बंगालमधील निवडणूक वातावरण आणखी तापलं असून सोशल मीडियावरही या वादाची जोरदार चर्चा सुरू आहे. निवडणुकीचे निकाल काही दिवसांनी लागणार असले तरी अजय पाल शर्मा यांच्याभोवती निर्माण झालेलं हे वादळ सध्या बंगालच्या राजकारणात केंद्रस्थानी आलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news