Amit Tiwari: कोण आहेत अमित तिवारी? अभिजीत दिपके यांच्या वडिलांच्या उत्पन्नावर उपस्थित केले गंभीर प्रश्न; चौकशीची मागणी

Who Is Amit Tiwari: आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी CJP संस्थापक अभिजीत दिपके यांच्या वडिलांच्या उत्पन्नाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
Who Is Amit Tiwari
Who Is Amit TiwariPudhari
Published on
Updated on

Who Is Amit Tiwari: कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके आणि त्यांच्या वडिलांच्या आर्थिक स्थितीवर प्रश्न उपस्थित करत अमित तिवारी यांनी चौकशीची मागणी केली आहे. दिपके यांचे वडील महाराष्ट्र शासनात कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) म्हणून कार्यरत होते.

त्यांच्या पगारातून मुलाचे अमेरिकेतील उच्च शिक्षण कसे झाले, असा सवाल तिवारी यांनी उपस्थित केला आहे. यासोबतच त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे अधिकृत तक्रार दाखल करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

कोण आहेत अमित तिवारी?

अमित तिवारी हे गुजरातमधील सुरत येथील रहिवासी असून ते आरटीआय (माहितीचा अधिकार) कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. अभिजीत दिपके आणि त्यांच्या वडिलांविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर ते चर्चेत आले आहेत. यापूर्वी ते फारसे प्रसिद्ध नव्हते.

नेमका काय आहे आरोप?

अमित तिवारी यांनी दावा केला की, अभिजीत दिपके यांचे वडील भगवानराव दिपके हे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होते.

तिवारी यांच्या मते, जर त्यांचा मासिक पगार सुमारे 60 ते 65 हजार रुपये असेल, तर त्यांनी आपल्या मुलाचे अमेरिकेतील उच्च शिक्षणाचा खर्च कसा उचलला? या आर्थिक व्यवहारांची चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तसेच, जर या प्रकरणात उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता (Disproportionate Assets) असल्याचे आढळले, तर संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

महाराष्ट्र सरकारकडे तक्रार

अमित तिवारी यांनी महाराष्ट्र सरकारकडे लेखी तक्रार देत भगवानराव दिपके यांच्या उत्पन्नाचे स्रोत, मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, सरकारी सेवेत असलेल्या अधिकाऱ्याच्या उत्पन्नात आणि खर्चात मोठी तफावत असल्यास त्याची तपासणी होणे आवश्यक आहे.

CJP विरोधातही केली तक्रार

अभिजीत दिपके यांच्या विरोधातील तक्रारीसोबतच अमित तिवारी यांनी कॉकरोच जनता पार्टी (CJP) विरोधातही स्वतंत्र तक्रार दाखल केली आहे. त्यांचा आरोप आहे की, CJP ही अधिकृतपणे नोंदणीकृत राजकीय पक्ष नसतानाही पक्षाप्रमाणे निधी गोळा करत आहे.

Who Is Amit Tiwari
K2 Mountain: निर्मल पुर्जांच्या मृत्यूनंतर K2 पर्वताची भीती; एव्हरेस्टपेक्षाही जास्त धोकादायक का मानला जातो?

तिवारी यांनी म्हटले आहे की, जर एखादी संस्था राजकीय पक्षाप्रमाणे कार्य करत असेल आणि देणग्या स्वीकारत असेल, तर लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या, 1951 (Representation of the People Act, 1951) कलम 29A अंतर्गत तिची नोंदणी असणे आवश्यक आहे. त्यांच्या दाव्यानुसार, CJP ने नोंदणी नसतानाही सुमारे 1 कोटी रुपयांचा निधी जमा केला, याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Who Is Amit Tiwari
Amit Shah Zero FIR: अमित शाहांना अपशब्द बोलणाऱ्या व्यक्तीविरोधात Zero FIR दाखल; कोणती कलमे लावली?

अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही

या प्रकरणावर अभिजीत दिपके, त्यांचे वडील किंवा कॉकरोच जनता पार्टी (CJP) यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळे अमित तिवारी यांनी केलेले आरोप आणि तक्रारींची सत्यता संबंधित यंत्रणांच्या चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news