Viral Video: कोणत्या नारळात जास्त पाणी? फळवाल्याने सांगितली सोपी ट्रिक; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Viral Trick Explained: नारळात किती पाणी असेल हा प्रश्न सोडवण्यासाठी एका फळवाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मोठे आणि आवाज करणारे नारळ टाळा, तर बाहेरून थोडे सुकलेले नारळ घ्या, अशी ट्रिक आहे.
Coconut Water
Coconut WaterPudhari
Published on
Updated on

How To Choose Coconut With More Water: नारळ खरेदी करताना अनेकदा एकच प्रश्न डोक्यात असतो, “या नारळात पाणी किती असेल?” कधी नारळ भरपूर पाण्याचा निघतो, तर कधी तो जवळपास कोरडाच असतो. त्यामुळे ग्राहकांचा नारळ घेताना गोंधळ उडतो. पण आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे हा गोंधळ काही प्रमाणात कमी होऊ शकतो, असा दावा केला जात आहे.

या व्हिडिओमध्ये एक फळविक्रेता अतिशय सोप्या भाषेत नारळ निवडण्याची ट्रिक सांगताना दिसत आहे. दररोज शेकडो-हजारो नारळ हाताळणाऱ्या या विक्रेत्याचा अनुभव लोकांना विश्वासार्ह वाटत असल्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

विक्रेत्याच्या मते, सर्वात आधी मोठ्या आकाराचा नारळ घेण्यापासून सावध राहायला हवं. तो सांगतो की खूप मोठे नारळ दिसायला आकर्षक असले, तरी त्यात पाणी कमी असण्याची शक्यता जास्त असते. त्याचप्रमाणे, हलवताना जास्त आवाज करणारा नारळही टाळावा, कारण अशा नारळात आत पाणी कमी असू शकतं.

व्हिडिओमध्ये तो प्रत्यक्ष उदाहरण देत वेगवेगळे नारळ कापून दाखवतो. पहिल्यांदा मोठा नारळ कापल्यावर त्यातून खूप कमी पाणी निघतं. दुसऱ्या एका नारळातून तर अजिबात पाणी निघत नाही. त्यामुळे तो अशा प्रकारचे नारळ खराब असल्याचं सांगतो.

Coconut Water
Gold-Silver Rate Today: सोन्याचे भाव घसरले; एका दिवसात किंमती किती कमी झाल्या? चांदीचा भाव काय आहे?

यानंतर तो तिसरा नारळ दाखवतो, जो बाहेरून थोडा सुकलेला दिसतो. विक्रेत्याच्या मते, असा नारळ घ्यावा. कारण आत पाणी जास्त असल्यामुळे बाहेरचा भाग थोडा कोरडा दिसतो. जेव्हा तो हा नारळ कापतो, तेव्हा त्यातून भरपूर पाणी बाहेर येताना दिसतं.

Coconut Water
RBI New Rules: 1 एप्रिलपासून डिजिटल पेमेंटमध्ये मोठा बदल; RBIने लागू केले नवे नियम, कोणते बदल होणार?

या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया येत आहेत. काही लोकांनी ही ट्रिक योग्य असल्याचं सांगितलं असून, त्यांनी स्वतःही असा अनुभव घेतल्याचं म्हटलं आहे. तर काही जणांनी या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येक वेळेस “सुकलेला दिसणारा नारळ” हा पाण्याने भरलेला असेलच, असं नाही.

एकूणच, हा व्हायरल व्हिडिओ लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की, अशा ट्रिक्स प्रत्येक वेळी अचूक ठरतीलच असं नाही. पुढच्या वेळी नारळ खरेदी करताना तुम्ही ही ट्रिक वापरून पाहणार का?

(टीप: ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओवर आधारित आहे)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news