Cockroach Janta Party: ‘कॉकरोच जनता पार्टी’ काय आहे? 72 तासांत 70 हजार सदस्य; सोशल मीडियावर चर्चा, महुआ मोईत्रांचा समावेश

Cockroach Janta Party: ‘कॉकरोच जनता पार्टी’ नावाची व्यंगात्मक राजकीय संकल्पना सोशल मीडियावर मोठ्या चर्चेचा विषय बनत आहे. अवघ्या 72 तासांत 70 हजार सदस्य जोडल्याचा दावा केला जात आहे.
Cockroach Janta Party
Cockroach Janta PartyPudhari
Published on
Updated on

What Is Cockroach Janta Party: सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्याच ‘राजकीय पक्षाची’ जोरदार चर्चा रंगली आहे. नाव ऐकून सुरुवातीला अनेकांना हा काहीतरी विनोद किंवा मीम वाटला. पण काही दिवसांतच या ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (CJP) इंटरनेटवर मोठी चर्चा निर्माण केली आहे. दावा असा केला जातोय की, अवघ्या 72 तासांत या पक्षाने 70 हजारांहून अधिक सदस्य जोडले आहेत.

नेहमीप्रमाणे मोठ्या सभा, झेंडे, पोस्टर्स किंवा प्रचार मोहीम न करता ही ‘पार्टी’ थेट सोशल मीडियातून चर्चेत आली. आता हा केवळ विनोद आहे की नाराज तरुणांचा नवा आवाज, यावर चर्चा सुरू झाली आहे.

एका वक्तव्यापासून सुरुवात

या संपूर्ण घडामोडीची सुरुवात बेरोजगार तरुणांबाबत करण्यात आलेल्या एका वक्तव्यामुळे झाल्याचं सांगितलं जात आहे. त्या विधानावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली. काहींनी नाराजी व्यक्त केली, तर काहींनी उपरोधिक पद्धतीने विरोध सुरू केला.

याच काळात अभिजीत दीपके यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’ ही संकल्पना मांडल्याचं सांगितलं जातं. सुरुवातीला हा फक्त व्यंगात्मक प्रयोग मानला जात होता. मात्र काही दिवसांतच त्याच्या पोस्ट, घोषणापत्र आणि सदस्य मोहीम सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली.

नेमकी काय आहे ‘कॉकरोच जनता पार्टी’?

पक्षाशी संबंधित लोकांच्या मते, व्यवस्थेने दुर्लक्ष केलेल्या लोकांचा आवाज बनण्याचा हा प्रयत्न आहे. बेरोजगार, उपेक्षित आणि सिस्टिममुळे नाराज असलेल्या लोकांसाठी हे एक व्यासपीठ असल्याचं सांगितलं जात आहे.

या ‘पक्षाची’ टॅगलाइन आणि सादरीकरणामुळे लोकांचे लक्ष वेधले गेले आहे. त्यामुळे काही जण याकडे निव्वळ मजा म्हणून पाहत असले, तरी काहींना हा सामाजिक नाराजीचा नवा प्रकार वाटत आहे.

Cockroach Janta Party
Supreme Court : सरकारी मंदिरांमधील पुजाऱ्यांच्या वेतनात हस्तक्षेपास ‌‘सर्वोच्च‌’ नकार

घोषणापत्रामुळे वाढली चर्चा

या ‘पक्षाच्या’ पाच सूत्री घोषणापत्राने सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं. त्यामध्ये महिलांसाठी 50 टक्के आरक्षण, माध्यमांच्या निष्पक्षतेवर भर, पक्षांतरावर कठोर नियम अशा मुद्द्यांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे.

विशेष म्हणजे, घोषणापत्र वारंवार वाचण्याचं आणि इतरांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. त्यामुळे त्याचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत.

महुआ मोइत्रा यांचं नाव चर्चेत

या चर्चेला राजकीय रंग तेव्हा मिळाला, जेव्हा काही नेत्यांची नावंही याच्याशी जोडली जाऊ लागली. महुआ मोईत्रा आणि किर्ती आझाद यांनी या ‘पार्टी’बाबत प्रतिक्रिया दिल्याची चर्चा सोशल मीडियावर झाली. त्यानंतर मीम्सचा पाऊस सुरू झाला.

काहींनी तिला “देशातील सर्वात प्रामाणिक पार्टी” म्हणून गंमतीत गौरवलं, तर काहींनी “इथे आश्वासनांपेक्षा व्यंग जास्त” अशी टिप्पणी केली.

Cockroach Janta Party
NEET Paper Leak Case: NEET तपासात नवा ट्विस्ट! शिवराज मोटेगावकरांच्या मुलाची CBI कडून चौकशी; आणखी मोठे खुलासे होणार?

विनोद की नव्या आंदोलनाची सुरुवात?

सोशल मीडियावर या ‘पक्षाबद्दल’ मतमतांतरे दिसत आहेत. काहींना हा केवळ मनोरंजनाचा भाग वाटतो, तर काहींच्या मते ही बेरोजगार आणि नाराज तरुणांची भावना व्यक्त करण्याची नवी पद्धत आहे.

आता ‘कॉकरोच जनता पार्टी’ ही फक्त इंटरनेटपुरती राहते की पुढे एखाद्या मोठ्या सामाजिक किंवा राजकीय चर्चेचं रूप घेते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news