

Bengal SIR Updates: पश्चिम बंगाल मतदार यादी पुनरीक्षण (SIR) प्रक्रिया राबवण्यात आळी त्यावेळी जवळपास २७ लाख लोकांची नावे हटवण्यात आली होती. त्या २७ लाख लोकांना पुन्हा दावा करण्यासाठी आणि आक्षेप नोंदवण्याची संधी देण्यात आली होती. निवडणूक आयोगाकडून स्थापन करण्यात आलेल्या न्यायाधिकाऱ्यांकडे लोकांनी आपला दावा आणि आक्षेप नोंदवला.
निवडणूक आयोगाने आतापर्यंत अनेक प्रकरणे निकाली काढली असून आश्चर्याची बाब म्हणजे आतापर्यंत निकाली काढण्यात आलेल्या प्रकरणांमधील जवळपास ९१ टक्के प्रकरणे अशी आहेत ज्यात तक्रारदाची बाजू ग्राह्य मानून त्यांचा पुन्हा मतदार यादीत समावेश करण्यात आला आहे. RTI च्या माध्यमातून हा आकडा समोर आल्यानंतर काँग्रेस पक्ष जाम भडकला आहे.
काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली असून काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान आणि मुख्य निवडणुक आयुक्तांनी मिळून SIR केलं अन् निवडणूक चोरी केली आता त्याचे पुरावे समोर येत आहेत अशी टीका केली.
निवडणूक आयोगाने दिलेल्या आकड्यानुसार न्यायाधिकाऱ्यांनी आतापर्यंत ८२७८२ अपील निकाली काढल्या. त्यातील ९१ टक्के म्हणजे ७५४४३ नाव पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. फक्त ८.८६ टक्के नावे म्हणजे फक्त ७४४९ दावे रद्द करण्यात आले आहेत.
काँग्रेस म्हणते की, 'पश्चिम बंगालमध्ये केंद्र सरकार आणि ज्ञानेश कुमार यांनी मिळून SIR केलं. निवडणूक चोरी केली. आता याचे पुरावे समोर आले आहेत. बातमी अशी आहे की ८२,७८२ अपीलवर सुनावणी झाली. त्यातील ९१ टक्के म्हणजे ७५,४४३ नावे पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.'
होय निवडणुकीपूर्वी जी नावे SIR मार्फत डिलीट केली होती. ती पुन्हा निवडणूक आयोगाच्या लिस्टमध्ये सामील झाली आहेत. ही ज्ञानेश कुमार यांची मत चोरीची सिस्टम आहे. ज्याद्वारे लोकांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला जात आहे. तुम्हाला आठवण करून देतो की २ महिन्यापूर्वी पश्चिम बंगालच्या एका सरकारी कार्यालयाला आग लागली होती. त्यात ४००० इव्हीएम मिशन जळून खाक झाले. याच इव्हीएमचा वापर विधानसभा निवडणुकीवेळी झाला होता. बंगालमध्ये मोठी मत चोरी झाली आहे. मात्र लक्षात ठेवा कोणत्याही मत चोराला सोडलं जाणार नाही.
काँग्रेस खासदार इशा खान चौधरी यांनी सांगितलं की, 'जे अपील निकाली काढले त्यातील ९१ टक्के नाव पुन्हा मतदार यादीत आले आहेत. यावरून सुरूवातीला योग्य आणि खऱ्या मतदारांची नावे अयोग्यपद्धतीने मतदार यादीतून काढून टाकली हे सिद्ध होतं. या प्रक्रियेमुळे अनेक नागरिक भयभीत झाले. अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले. सरकारी योजनांचा लाभ मिळण्यास अडचणी आल्या, अनेकांना नोकरीसाठी परदेशात देखील जाता आले नाही.
मुर्शिदाबाद: सर्वाधिक ७,४७,३०५ अपिल दाखल झाल्या. आतापर्यंत निकाली काढण्यात आलेल्या प्रकरणांपैकी ४३४ नावे बहाल करण्यात आली आणि ५३ नावे फेटाळण्यात आली.
मालदा: ५,३१,१४९ अपिलांपैकी निकाली काढण्यात आलेल्या सर्व १,४७१ प्रकरणांमध्ये नावे बहाल करण्यात आली.
उत्तर २४ परगणा: ३,५८,८७२ अपिलांपैकी निकाली काढण्यात आलेल्या सर्व २७७ प्रकरणांमध्ये नावे जोडण्यात आली.
दक्षिण २४ परगणा: ३,२१,३३२ अपिलांपैकी २०,१०७ नावे समाविष्ट करण्यात आली आणि २४ नावे फेटाळण्यात आली.
हुगळी: १९,५२८ मतदारांची नावे यादीत पुन्हा जोडण्यात आली.
दार्जिलिंग: ५०,७१२ अपिलांपैकी १५९ नावे समाविष्ट करण्यात आली आणि केवळ १ नाव फेटाळण्यात आले.