SIR voter list 2026 : अंतिम मतदारयादी ४ नोव्हेंबरला

'एसआयआर'मधील दावे, हरकतींसाठी सुधारित वेळापत्रक
voter list
voter listPudhari
Published on
Updated on

मुंबई : राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाच्या वेळापत्रक पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार हा बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता ३१ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदारयाद्या जाहीर केल्या जातील. तर, अंतिम मतदारयादी आता ७ ऑक्टोबरऐवजी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे राज्यातील या प्रक्रियेला जवळपास महिनाभराची मुदतवाढ मिळाली आहे.

राज्यभरात सुरू असलेल्या एसआयआरमध्ये तब्बल १ कोटी ८० लाख ६० हजार ६९७ मतदार याद्यांमधून बाहेर फेकले गेले आहेत. त्यात मुंबईतील संख्या ३७.५७% तर उपनगरांतील संख्या ३४.४७% आहे. ठाण्यातूनही २८ लाख ८८ हजार २४० मतदार यादीतून गायब आहेत. प्रारूप यादी ३१ ऑगस्टला आल्यानंतर हे सर्व मतदार आपले आक्षेप नाेंदवू शकतील. अन्यथा अंतिम मतदार यादी आल्यानंतर या सर्व मतदारांना सर्व पुरावे घेऊन नव्‍याने मतदार नोंदणी करावी लागेल.

voter list
Maharashtra auto rickshaw Marathi rule : रिक्षा-टॅक्सीचालकांसाठी आजपासून मराठीची सक्‍ती

प्रारूप मतदारयादीवर दावे व हरकती दाखल करण्यासाठी ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर असा कालावधी देण्यात आला आहे. दाखल झालेल्या दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर या कालावधीत पूर्ण करायची आहे. त्यानंतर, ४ नोव्हेंबरला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे.

voter list
Sangamner Solar Project Protest: एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्पाला विरोध; संगमनेरमध्ये १० ते १२ आंदोलकांना ताब्यात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news