Pune SIR Voter List: एसआयआरमध्ये ५५ लाख मतदारांच्या नोंदी संशयाच्या भोवऱ्यात; फॉर्म प्रलंबित, बीएलओंच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

घरभेटी न झाल्याच्या तक्रारी; फॉर्म स्वीकारल्याची पावतीही न मिळाल्याने राजकीय पक्षांकडून पारदर्शकतेची मागणी
Voter List
Voter Listpudhari photo
Published on
Updated on

पुणे: मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयआर) मोहिमेत मोठ्या संख्येने फॉर्म अद्याप प्रलंबित असल्याने राजकीय पक्षांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अनेक ठिकाणी बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) प्रत्यक्ष मतदारांच्या घरापर्यंत पोहोचत नसल्यामुळे फॉर्म जमा होण्याचे प्रमाण कमी असल्याचा आरोप पक्षांच्या प्रतिनिधींनी केला आहे.

Voter List
Pune NCP Corporators Protest: राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा विकासनिधी ‘शून्य’; पुणे महापालिकेत भाजपविरोधात ठिय्या आंदोलन

उपलब्ध आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील २.०७ कोटी मतदारांपैकी जवळपास ५५ लाख नोंदी मृत, स्थलांतरित किंवा दुबार असल्याचे आढळले आहे. यामध्ये ३४.८ लाख मृत किंवा स्थलांतरित मतदार, १७.६ लाख दुबार नोंदी आणि सुमारे २.२३ लाख मतदार अन्य श्रेणीत आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने फॉर्म परत न आल्याने मतदार यादीतील नोंदींची अचूकता आणि एसआयआर प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत चिंता व्यक्त होत आहे.

Voter List
Pune Pothole Free City: पुणे खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिकेचे ‘मिशन’; १५ अभियंत्यांवर जबाबदारी, महिनाभरात टार्गेट पूर्ण करण्याचे आदेश

दरम्यान, बीएलओच्या कामासाठी पुणे महापालिकेतील १,५०० कर्मचारी आणि शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचा परिणाम मालमत्ता करवसुली, पाणीपुरवठा आणि इतर नागरी सेवांवर होत असल्याचेही समोर आले आहे. मनुष्यबळाची कमतरता, विविध विभागांतील समन्वयाचा अभाव आणि घरभेटींमधील अडचणी यामुळे एसआयआर मोहीम प्रभावीपणे राबवण्यात अडथळे येत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Voter List
Duty Free Sugar Import: साखरेचा साठा घटला; दरवाढ रोखण्यासाठी १० लाख टन कच्ची साखर ‘ड्युटी फ्री’ आयात

मतदारांनी निर्धारित मुदतीत फॉर्म भरून जमा करावेत आणि फॉर्म स्वीकारल्याची पावती आवर्जून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखून प्रत्येक पात्र मतदाराचे नाव अंतिम मतदार यादीत कायम राहील, याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी राजकीय पक्षांनी केली आहे.

Voter List
Purandar Airport Daund Development: पुरंदर विमानतळ ठरणार दौंडच्या विकासाचे ‘टेकऑफ’; उद्योग, शेती आणि रोजगाराला नवी झेप

काय म्हणतात पक्षांचे प्रतिनिधी?

अनेक ठिकाणी बीएलओंनी मतदारांना फॉर्म दिले; मात्र, फॉर्म स्वीकारल्यानंतर त्याची पावती दिली नाही. काही भागांत बीएलओंनी घरभेट न देता मतदारांनी स्वतः कार्यालयात येऊन फॉर्म जमा करावेत, असे सांगितल्याच्या तक्रारीही आहेत. त्यामुळे फॉर्म जमा करूनही त्याची नोंद झाली नाही किंवा फॉर्म हरवला, तर मतदारांकडे कोणताही पुरावा राहणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news