Crime News: हातात सुरा, मांडीवर पत्नीचे कापलेले डोके आणि बाजूला दोन मुले...; मंदिरातील 'ते' दृश्य पाहून गावकरीही हादरले

नोकरी गेल्याच्या नैराश्यातून आणि आर्थिक विवंचनेतून पतीने पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना पश्चिम बंगालमधील दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे.
crime news
crime newsFile Photo
Published on: 
Updated on: 

Crime News

कोलकाता: नोकरी गेल्याच्या नैराश्यातून आणि आर्थिक विवंचनेतून पतीने पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना पश्चिम बंगालमधील दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. आरोपी पती पत्नीचे कापलेले डोके मांडीवर घेऊन एका काली मंदिरात बसला होता, तर त्यांची दोन मुलेही त्याच्या शेजारी बसलेली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, गंगारामपूर येथील नारायणपूर (वॉर्ड क्र. ४) परिसरात ही थरारक घटना घडली. रिंटू घोष असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो माजी बस कंडक्टर आहे. रिंटूने त्याची पत्नी सीमा सरकार (वय ३५) हिची हत्या करून तिचे कापलेले डोके घेऊन स्थानिक काली मंदिरात गेला. तेथे तो हातात सुरा आणि मांडीवर पत्नीचे डोके घेऊन बसला होता. त्याच्या शेजारी त्याची दोन मुलेही बसली होती.

crime news
Dharashiv Crime News : तुळजापुरात प्रेम प्रकरणाच्या संशयातून १८ वर्षीय तरुणाची हत्या

मंदिरात रिंटूला अशा भयानक अवस्थेत पाहून स्थानिक रहिवाशांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच गंगारामपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक पूर्णेंदू कुंडू यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रिंटूला ताब्यात घेतले तर, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला.

नोकरी गेल्याने मानसिक संतुलन ढासळले

पोलिसांच्या गाडीत बसवताना रिंटूने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, "नॉर्थ बंगाल स्टेट ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनमधील माझी नोकरी गेल्यानंतर मी पोलीस ठाण्यातही गेलो होतो. त्यानंतर मी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचलो आणि वेडा झालो."

तांत्रिक पूजा आणि वर्तनातील बदल

आरोपीच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, नोकरी गेल्यानंतर रिंटूने छोटा-मोठा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण त्यातही त्याला यश आले नाही. या आर्थिक संकटामुळे त्याच्या वर्तनात मोठे बदल झाले होते. त्याने मांसाहार सोडला होता आणि तो तांत्रिक पूजेकडे वळला होता, असा दावा त्याच्या नातेवाइकांनी केला आहे. या हत्येमागील अचूक कारण आणि कौटुंबिक कलह की तांत्रिक पूजेचा प्रकार आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलीस आरोपी रिंटूची कसून चौकशी करत आहेत.

crime news
Kalyan Crime News: उकळते मटण पत्नीसह चिमुकल्याच्या अंगावर फेकले; मद्यपी पतीचे संतापजनक कृत्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.