Kalyan Crime News: उकळते मटण पत्नीसह चिमुकल्याच्या अंगावर फेकले; मद्यपी पतीचे संतापजनक कृत्य

वालधुनी परिसरातील घटना; पत्नी आणि चिमुकला गंभीर भाजले, महात्मा फुले पोलिसांत पतीविरोधात गुन्हा दाखल.
Kalyan Crime News
Kalyan Crime NewsPudhari
Published on: 
Updated on: 

डोंबिवली: पत्नीने पैसे देण्यास इन्कार केल्याच्या रागातून संतापलेल्या मद्यपी पतीने उकळते मटणाचे पातेले पत्नीसह पाच वर्षाच्या चिमुकल्याच्या अंगावर फेकल्याची अत्यंत संतापजनक आणि अमानुष घटना कल्याण पश्चिमेकडे असलेल्या वालधुनी परिसरात घडली. यात पत्नी आणि चिमुकला गंभीररित्या भाजला असून याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kalyan Crime News
Pudhari Impact: टिटवाळ्यातील ‘व्हाईट कॉलर’ अतिक्रमणावर कारवाईचा बडगा; दै.पुढारीच्या वृत्ताची महापौरांकडून दखल

अमिर शाहित खान असे आरोपीचे नाव असून गुलशन खान हिने त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. खान कुटुंब वालधुनी परिसरातील सुन्नी जामा मशिदीजवळील एका चाळीत राहते.

गुरूवारी दुपारी अमिर, गुलशन आणि त्यांची दोन मुले घरी असताना हा धक्कादायक प्रकार घडला. अमिर याने पत्नी गुलशनकडे पैशांसाठी तगादा लावला होता.

मात्र गुलशनने पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद सुरू झाला. या वादातून संतापलेल्या अमिरने पत्नीला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्याने त्याच्या पाच वर्षांच्या मुलाच्या सदऱ्याची गळपट्टी पकडून ओढत बाथरूमच्या दिशेने फरफटत नेले.

याच दरम्यान स्वयंपाकघरात गॅसवर जेवणासाठी मटण शिजत ठेवले होते. अमिरने गॅसवर उकळत असलेले मटणाचे पातेले उचलले. त्यातील उकळते पाणी आणि गरम मटण पत्नीच्या दिशेने फेकले ते पत्नी गुलशनच्या हाता-पायांवर पडले.

Kalyan Crime News
Mumbra water cut: मुंब्र्यातील नियोजित पाणीकपात रद्द; दिवाळीत अखंडित पाणीपुरवठा, १६ नोव्हेंबरपर्यंत स्थगित

या घटनेनंतर गुलशनने शेजारीच राहणाऱ्या तिच्या बहिणीला घरी बोलावून घेतले. त्यानंतर जखमी अवस्थेतील गुलशन आणि तिच्या मुलाला केडीएमसीच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात नेले. तेथे दोघा माय-लेकावर उपचार करण्यात आले.

उपचारानंतर गुलशनने महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात धाव घेऊन हिंसाचारी पती अमिरच्याविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अमिर खान याच्याविरोधात अल्पवयीन मुलांच्या संरक्षण आणि काळजीसंदर्भातील कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.