Thane Crime News: खुनाच्या गुन्ह्यातील अट्टल गुंडास राजस्थानातून अटक

दरम्यान या घटनेचा समांतर तपास ठाणे खंडणी विरोधी पथक करीत होते.
Arrested
ArrestedPudhari
Published on
Updated on

ठाणे: चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न करणाऱ्या फरार गुंडास ठाणे खंडणी विरोधी पथकाने राजस्थान मधून बेड्या ठोकल्या आहेत. ओमकार भोसले (27, ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली.

काही दिवसांपूर्वी चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंड ओमकार भोसले याने खुनाचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल होताच हा गुंड फरार झाला होता. दरम्यान या घटनेचा समांतर तपास ठाणे खंडणी विरोधी पथक करीत होते.

Arrested
Aadhaar Biometric Update: आधार अपडेटअभावी शिष्यवृत्ती, शैक्षणिक सुविधांमध्ये अडथळे

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी राजस्थान मध्ये लपून असल्याची माहिती ठाणे खंडणी विरोधी पथकास मिळाली. त्यानंतर एक पथक थेट राजस्थान मध्ये आरोपीच्या अटकेसाठी गेले होते. ठाणे पोलीस पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपी भोसले यास 27 ऑगस्ट रोजी रिंगस, जिल्हा सिकर, राजस्थान येथून अटक केली.

Arrested
Palghar Weather: जिल्ह्यात ३ सप्टेंबरपर्यंत हलक्या स्वरूपात पाऊस; सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

आरोपीस शुक्रवारी ठाण्यात आणण्यात आल्यानंतर त्यास चितळसर पोलिसांच्या ताब्यात पुढील तपासासाठी देण्यात आले आहे अशी माहिती ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी दिली. अटकेतला आरोपी अट्टल गुंड असून त्याच्यावर खूनाचा प्रयत्न, खंडणी व इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news