Karni Mata Temple | भक्तीच्या दारात वसुलीचा 'बाजार'! करणी माता मंदिरात युट्युबर्सची लूट; चित्रीकरणासाठी मागितले ११०० रुपये!

Karni Mata Temple | विदेशी युट्युबरने व्‍हिडिओ केला शेअर
Karni Mata Temple
राजस्थानच्या करणी माता मंदिरात एका विदेशी युट्युबरला आलेला अनुभव मंदिर प्रशासनाच्या 'व्यावसायिक' धोरणाचे भावाडे काढणारा ठरला आहे.
Published on
Updated on

Karni Mata Temple viral news

बीकानेर : भाविकांचे श्रद्‍धास्‍थान असणार्‍या राजस्थानच्या करणी माता मंदिरात एका विदेशी युट्युबरला आलेला अनुभव मंदिर प्रशासनाच्या 'व्यावसायिक' धोरणाचे भावाडे काढणारा ठरला आहे. "तुम्ही युट्युबर असाल तर ११०० रुपये द्या", असा आदेशच येथे काढण्यात आला असून, भक्तीच्या नावाखाली ही एक प्रकारची सक्तीची वसुली असल्‍याचे विदेशी युट्युबरने म्‍हटले आहे. हा व्‍हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल होत आहे.

युट्युबर दिसला की दरात वाढ!

साध्या मोबाईल किंवा कॅमेऱ्यासाठी ३० ते ७० रुपये घेणारे मंदिर प्रशासन युट्युबर समोर येताच थेट १,१०० रुपयांची मागणी करते. एका विदेशी पर्यटकाने मंदिरात चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला या अजब नियमाचा फटका बसला. विशेष म्हणजे, या पर्यटकाने आधीच ५०० रुपये स्वेच्छेने देणगी दिली होती, तरीही प्रशासनाने त्याच्याकडून 'युट्युबर' असल्याच्या नावाखाली अतिरिक्त पैसे उकळले.

Karni Mata Temple
Sant Godad Maharaj Trustee Controversy: संत गोदड महाराज मंदिराच्या विश्वस्त नेमणुकीवरून वाद

प्रशासनाचा अजब तर्क

मंदिरात लावलेल्‍या फलकावर साधा व्हिडिओ: ७० रुपये, युट्युब व्हिडिओ: १,१०० रुपये, डॉक्युमेंटरी: २५,००० रुपये असे दरपत्रकच देण्‍यात आले आहे. संबंधित युट्युबरने जेव्हा एवढ्या मोठ्या रकमेबद्दल जाब विचारला, तेव्हा मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले की, "हे पैसे मंदिरासाठी आहेत." एखाद्या सामान्य व्यक्तीने काढलेला व्हिडिओ आणि युट्युबरने काढलेला व्हिडिओ यात मंदिराच्या नियमावलीत एवढा मोठा फरक का? असा सवालही युट्युबरने केला आहे.

Karni Mata Temple
Lonar Lake Maharashtra: विवरप्रसिद्ध लोणार : उल्कापातातून निर्माण झालेलं जागतिक भू-आश्चर्य आणि दैत्यसूदन मंदिराचा ऐतिहासिक वारसा

'देणगी' की 'सक्ती'?

मंदिरात जाणाऱ्या भाविकाने किती देणगी द्यावी हा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. मात्र, करणी माता मंदिरात "तुम्ही युट्युबर आहात" हे ओळखून लावलेले हे नियम म्हणजे पर्यटकांच्या आणि कंटेंट क्रिएटर्सच्या हतबलतेचा फायदा घेण्यासारखेच आहे. बाहेर फलक लावून पैसे मागणे हे मंदिराच्या पवित्रतेला साजेसे नसल्याची कमेंट सोशल मीडियावर होत आहे.

Karni Mata Temple
Burj Khalifa revenue : ‌‘बुर्ज खलिफा‌’ बघायला येणारे दुबई सरकारला देतात 5,154 कोटी

युट्युबर म्‍हणून जास्‍तीचा भार टाकणे कितपत योग्‍य?

"मी आधीच ५०० रुपये देणगी दिली होती, तरीही मला ११०० रुपये मागितले गेले. केवळ मी युट्युबर आहे म्हणून हा जास्तीचा भार टाकणे कितपत योग्य आहे?" असा संतप्त सवाल विदेशी पर्यटकाने उपस्थित केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news