पुढारी वृत्तसेवा
दुबईतील ‘बुर्ज खलिफा’ ही जगातील सर्वात 828 मीटर उंच इमारत इराण आणि अमेरिका-इस्रायल युद्धाने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
या इमारतीला बांधण्यासाठी सुमारे 1.4 अब्ज डॉलर्सचा खर्च आला असून, हिचे नाव अबुधाबीचे शासक खलिफा बिन जायद अल नाहयान यांच्या सन्मानार्थ ठेवले होते.
आर्किटेक्चर एड्रियन स्मिथ आणि बिल बेकर यांनी या इमारतीचे डिझाईन केले. या इमारतीला असे बांधले की, वेगवान हवा आणि हवामानाचा कोणताही परिणाम हिच्यावर व्हायला नको.
या इमारतीला बाहेरून 26 हजार वजनी काचांचे पॅनल लावले आहेत. याचे शिखर 4 हजार टन स्टीलपासून बनलेले आहे.
या इमारतीत रोज सुमारे 9.4 लाख लिटर पाण्याचा पुरवठा होतो. यात 57 लिफ्टस् आहेत. ज्यात जगातील सर्वात उंच सर्व्हिस लिफ्टदेखील असून, ती 5 हजार किलोपर्यंत वजन उचलू शकते.
पर्यटकांच्या तिकीट विक्रीतून या इमारतीला दरवर्षी सुमारे 621 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 5,154 कोटी रुपये) कमाई होते.
या इमारतीतील अपार्टमेंटस्च्या किमती कोट्यवधी रुपये आहेत. या इमारतीच्या सुरुवातीच्या मजल्यावर प्रसिद्ध ब्रँडचे शानदार हॉटेल आहे. याच्या वरच्या मजल्यांवर प्रायव्हेट अपार्टमेंटस् आहेत. 122 व्या मजल्यावर पॉश रेस्टॉरंट आहे.
124 व्या, 125 व्या आणि 148 व्या मजल्यावर ‘ऑब्जर्वेशन डेक’ आहेत. जेथून दुबईचा 360 डिग्री नजारा पाहायला मिळतो. याशिवाय यात मोठे कॉर्पोरेटस् ऑफिस, स्पा, जिम आणि स्विमिंग पूलदेखील आहेत.