Viral News: ना पगार, ना अनुभव... नोकरी नाकारण्याचं अजब कारण; कंपनीचं 'हे' लॉजिक ऐकून तुमच डोकं फिरल! रिजेक्शन लेटर व्हायरल

viral reddit job story: कॉर्पोरेट विश्वातील नोकरभरतीचे नियम आणि अटी नेहमीच चर्चेत असतात, पण सध्या सोशल मीडियावर नोकरी नाकारल्याची एक अजब पोस्ट व्हायरल होत आहे.
viral reddit job story
viral reddit job storyFile Photo
Published on
Updated on

viral reddit job story

मुंबई: कॉर्पोरेट विश्वातील नोकरभरतीचे नियम आणि अटी नेहमीच चर्चेत असतात, पण सध्या सोशल मीडियावर नोकरी नाकारल्याची एक अजब पोस्ट व्हायरल होत आहे. आधीचे ऑफिस नव्या कंपनीपासून अवघ्या ६०० मीटर अंतरावर असल्याच्या कारणावरून एका कंपनीने तरूणाला नोकरी देण्यास नकार दिला. डेटा सुरक्षा आणि गोपनीयतेचे कारण देत कंपनीने हा निर्णय घेतला असून, या अजब धोरणावर आता नेटकर्‍यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

कंपनीने चक्क अंतर मोजले!

संबंधित तरूणाने Reddit या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्यासोबत घडलेला हा प्रकार शेअर केला आहे. सुरुवातीला या उमेदवाराची प्रोफाईल आणि कामाचा अनुभव कंपनीला खूप आवडला होता. निवड प्रक्रियेचे पहिले काही टप्पेही सुरळीत पार पडले. मात्र, त्यानंतर कंपनीकडून एक ई-मेल आला. कंपनीने आपल्या अंतर्गत धोरणांचा संदर्भ देत, आधीचे ऑफिस जवळ असल्याने डेटा सुरक्षेचा धोका निर्माण होऊ शकतो, असे सांगत हा अर्ज फेटाळला.

viral reddit job story
salary increase tips: फक्त ८ महिन्यांत पगार ११ लाखांवरून ३३ लाख रुपये झाला; तरुणाने सांगितली करिअरची 'सीक्रेट ट्रिक'

रिजेक्शन लेटरमध्ये काय लिहिले?

उमेदवाराने ई-मेलचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, "तुमची प्रोफाईल आणि अनुभव आम्हाला आवडला. परंतु, गोपनीयता आणि डेटा सुरक्षेशी संबंधित आमच्या अंतर्गत व्यवस्थापन धोरणांमुळे, आम्ही तुमच्या अर्जावर पुढे प्रक्रिया करू शकत नाही. कारण, तुमची आधीची कंपनी आमच्या ऑफिसपासून अवघ्या ६०० मीटर अंतरावर आहे. हा निर्णय पूर्णपणे कंपनीच्या धोरणावर आधारित असून, याचा तुमच्या क्षमतेशी किंवा व्यावसायिकतेशी काहीही संबंध नाही."

यावर प्रतिक्रिया देताना तरूणाने म्हटले आहे की, "माझ्या आयुष्यातील हे सगळ्यात विनोदी रिजेक्शन लेटर आहे. त्यांनी चक्क दोन्ही ऑफिसमधील अंतर मोजले!" मात्र, तरीही इतर उमेदवाराची निवड झाली असे खोटे कारण न सांगता कंपनीने स्पष्टपणे खरे कारण सांगितल्याबद्दल त्याने समाधानही व्यक्त केले आहे. उमेदवाराने कंपनीचे नाव मात्र जाहीर केलेले नाही.

viral reddit job story
IIT Delhi Graduateने का नाकारली १७ लाखांची नोकरी? इन्स्टा पोस्टमध्ये मांडली ‘Toxic’ वर्क कल्चरची व्यथा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news