salary increase tips: फक्त ८ महिन्यांत पगार ११ लाखांवरून ३३ लाख रुपये झाला; तरुणाने सांगितली करिअरची 'सीक्रेट ट्रिक'

Success Story: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर एका तरुणाने त्याचा पगार फक्त ८ महिन्यांत ११ लाख रुपयांवरून वार्षिक ३३ लाख रुपये कसा झाला, याबाबत करिअरची 'सीक्रेट ट्रिक' सांगितली आहे.
salary increase tips
salary increase tipsfile photo
Published on
Updated on

salary increase tips

नवी दिल्ली : सोशल मीडियावर दररोज असे दावे व्हायरल होतात की त्यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर एका तरुणाने दावा केला की त्याचा पगार फक्त ८ महिन्यांत ११ लाख रुपयांवरून वार्षिक ३३ लाख रुपयांवर गेला. त्याने हे कसं केलं, त्याची युक्ती देखील शेअर केली आहे.

तीन वर्षे एकाच नोकरीत अडकूनही वाढ झाली नाही

रेडिट वापरकर्त्याने 'माझा नोकरीचा प्रवास ८ महिन्यांत ११ लाख रुपयांवरून ३३ लाख रुपये पर्यंत' या शीर्षकाखाली आपली गोष्ट सांगितली आहे. त्याने स्पष्ट केले की, २०२५ ची सुरुवात त्याच्यासाठी खूप निराशाजनक होती. तो गेल्या तीन वर्षांपासून एकाच नोकरीत कोणताही पगार वाढ किंवा पदोन्नती न मिळाल्याने अडकला होता. इतकेच नव्हे, तर कंपनीने त्याला 'परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट प्लॅन' (PIP) मध्ये टाकले होते, ज्यामुळे तो पूर्णपणे निराश झाला होता.

salary increase tips
UPI Credit Line: खात्यात पैसे नसले तरीही पेमेंट करता येणार! काय आहे 'UPI क्रेडिट लाइन'? तुम्हाला कसा होईल फायदा?

हजारो अर्ज, तरीही नाकारले

मार्च २०२५ मध्ये त्याने नवीन नोकरी शोधण्यास सुरुवात केली, पण त्याला सर्वत्र नकारात्मक प्रतिसादच मिळत होता. १,००० हून अधिक अर्ज पाठवून आणि ३०० हून अधिक रिक्रूटर्सना ईमेल करूनही त्याला चांगले इंटरव्ह्यू मिळत नव्हते. 'आधीच्या कंपनीच्या नावामुळे' अनेक कंपन्या त्याला कमी पगाराचे ऑफर देत होत्या.

गेम चेंजर ठरली ही 'सीक्रेट ट्रिक'

सतत होणाऱ्या नकाराने त्रस्त झाल्यानंतर, या तरुणाने एक वेगळी युक्ती वापरण्याचा निर्णय घेतला. त्याने कोणत्याही विशेष आकर्षकतेशिवाय, साधी आणि 'पर्सनल पोर्टफोलिओ वेबसाइट' तयार केली. या वेबसाइटवर त्याने आपली कौशल्ये, केलेल्या प्रोजेक्ट्सच्या लिंक्स, महत्त्वाच्या उपलब्धी आणि कामाच्या अनुभवाविषयी माहिती थोडक्यात दिली. त्याने सांगितले, "मी डेव्हलपर असल्याने काही तासांतच ही वेबसाइट बनवली, ती आकर्षक नसली तरी स्वच्छ आणि वैयक्तिक होती."

salary increase tips
new labour codes: नवीन कामगार कायद्यांमुळे ७७ लाख नोकऱ्या! बेरोजगारी १.३ टक्क्यांनी घटणार; SBI चा महत्त्वाचा अहवाल

रिक्रूटर्सची लागली रांग

या तरुणाने आपल्या LinkedIn प्रोफाइलवर या पोर्टफोलिओ वेबसाइटची लिंक पोस्ट करताच चित्र बदलले. त्याला अचानक रिक्रूटर्सनी संपर्क करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, ज्या मोठ्या टेक कंपन्या आणि गुंतवणूक असलेल्या स्टार्टअप्सनी पूर्वी त्याचे अर्ज नाकारले होते, त्यांनीही त्याला मुलाखतीसाठी बोलावले. परिणामी, जुलै महिन्यापर्यंत त्याला देशातील एका प्रमुख गुंतवणूक बँकेकडून आपल्या सध्याच्या पगाराच्या दुप्पट पगारवाढीचा प्रस्ताव मिळाला आणि गेल्या महिन्यात त्याने ती नोकरी स्वीकारली. त्याचा वार्षिक पगार ११ लाख रुपयांवरून ३३ लाख रुपये झाला. "मी माझा प्रवास यासाठी शेअर केला, कारण मी जिथे काही महिन्यांपूर्वी अडकलो होतो, तिथे कदाचित कोणीतरी अडकले असेल," असे त्याने पोस्टच्या शेवटी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news