Vijay Vande Mataram Controversy: वंदे मातरंम नाही, आधी 'तमिल थाई' वाजणार.. मुख्यमंत्री विजय यांच्या निर्णयानंतर वाद तर होणारच

Vijay Vande Mataram Controversy
Vijay Vande Mataram Controversypudhari
Published on
Updated on

Vijay Vande Mataram Controversy: तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांच्या सरकारने एक महत्वाचा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार आता राज्यात सर्व अधिकृत कार्यक्रमादरम्यान सर्वात आधी राजकीय गीत तमिल थाई वाझथु म्हटलं जाणार आहे. हा निर्णय ज्यावेळी गृह मंत्रालयाने वंदे मातरंम बाबत दिलेल्या आदेशानंतर घेण्यात आला आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटणार आहे.

Vijay Vande Mataram Controversy
Vijay Wadettiwar allegation: आदिवासी विभागाचा निधी जातो कुठे? विजय वडेट्टीवार यांचा आरोप

कोणत्या कार्यक्रमांसाठी नियम लागू?

राज्याचे मुख्य सचिव एम. साई कुमार यांनी बुधवारी एक आदेश जारी केला. त्यानुसार आता राज्यात सर्व सार्वजनिक, शैक्षणिक आणि सरकारी कार्यक्रमांची सुरूवात तमिल थाई वाझथु या गीतानं होणार आहे. हा निर्णय राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना विद्यापीठांना आणि सरकारी कार्यालयांना तसेच सार्वजनिक क्षेत्रातील सर्व उपक्रमांना लागू होणार आहे.

दिव्यांगांना असणार सूट

या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व लोकांना हे गीत वाजवले जात असताना सन्मानार्थ उभे रहाणे सक्तीचे असणार आहे. मात्र यातून दिव्यांग व्यक्तींना सूट देण्यात आली आहे.

हा आदेश तमिळनाडू विधानसभेने सर्वसम्मतीने पास झाला आहे. मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी हा प्रस्ताव मांडला. त्यावेळी ते म्हणाले की, 'तमिळ जगातील प्रातीन शास्त्रीय भाषा आहे. तमिळ सभ्यता जगातील सर्वात जुनी सांस्कृतिक परंपरांमधील एक आहे. विधानसभा गर्वाने ही गोष्ट नमुद करते.

Vijay Vande Mataram Controversy
Thalapathy Vijay|'Jana Nayagan'ची ऐतिहासिक कामगिरी! तब्बल १० लाख प्री-बुकिंग पार करणारे पहिले भारतीय अभिनेते ठरले थलपती विजय

तमिळ थाई वाझथु इतिहास?

हे गीत १८९१ मध्ये मनोनमनियम सुंदरनार यांनी लिहिलेल्या मनोनमनियर या नाटकातून घेण्यात आले आहे.

२३ नोव्हेंबर १९७० पासून हे गीत सरकारी कार्यक्रमांच्या सुरूवातीला गायलं जात आहे.

१२ डिसेंबर २०२१ रोजी याला अधिकृतपणे तमिळनाडूचे राजकीय गीत म्हणून दर्जा मिळाला.

त्यानंतर सरकारी कार्यालय आणि सरकारी संस्थांमध्ये हे गीत गाणं सक्तीचं करण्यात आलं.

Vijay Vande Mataram Controversy
Amit Thackeray On Tamil Nadu NEET: महाराष्ट्र आधी... राजकारण नंतर! तमिळनाडूचा एक निर्णय अन् अमित ठाकरेंनी केली मोठी पोस्ट

वंदे मातरंमशी काय कनेक्शन?

तमिळनाडू सरकारने दिलेला आदेशाची टायमिंग चर्चेचा विषय ठरली आहे. केंद्रीय गृह खात्याने वंदे मातरंम गाण्याबाबत काही दिशा निर्देश प्रसिद्ध केले. हे आदेश ९ जुलै रोजी देण्यात आले होते. त्यानंतर आता १० ऑगस्ट रोजी तमिळनाडू सरकारने तमिळ थाई वाझुथ गीताबाबत आदेश दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news