Varanasi Airport Firing : विमानतळावर प्रवाशाच्या पिस्तूलमधून अनावधानाने गोळी सुटली; सुरक्षा रक्षकासह दोघे जखमी

वाराणसी येथील लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर काही काळ खळबळ
Varanasi airport accidental firing
Varanasi airport accidental firing File Photo.
Published on
Updated on

Varanasi Airport Accidental Firing : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळी सुरक्षा तपासणीदरम्यान एका प्रवाशाच्या परवानाधारक पिस्तूलमधून अचानक गोळी सुटल्याने किमान दोन जण जखमी झाले. पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती दिली आहे.

नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशातील आझमगड येथील रहिवासी असलेले कमलेश राय हे आपल्या पत्नीसह एअर इंडिया एक्स्प्रेसच्या 'IX1810' या विमानाने मुंबईला जाण्यासाठी विमानतळावर आले होते. सुरक्षा तपासणीदरम्यान त्यांच्याकडील शस्त्र आणि काडतुसांची तपासणी केली जात असताना अचानक हा गोळीबार झाला.या अपघातात सुरक्षा यंत्रणेतील एका महिला कर्मचाऱ्याच्या पायाला गोळी लागली, तर जवळच उभा असलेला आणखी एक व्यक्ती अंगठ्याला गोळी लागून जखमी झाला. घटनेनंतर तात्काळ दोघांनाही उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Varanasi airport accidental firing
ICC WTC Points Table : ऑस्‍ट्रेलियामध्‍ये बांगलादेशचा विजय ! WTCच्या शर्यतीत रंगत; टीम इंडियाची स्थिती काय?

कायदेशीर कारवाई सुरु

"घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसराची पाहणी केली जात असून आवश्यक ती माहिती गोळा केली जात आहे. या प्रकरणात कायदेशीर कारवाई सुरू आहे," असे वरिष्ठ पोलीस अधिकारी नीतू कादयान यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

जखमी कर्मचार्‍यांवर उपचार सुरु

विमानतळ प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जखमी झालेल्या दोन्ही कर्मचाऱ्यांना न्यू लक्ष्मी ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून स्थानिक पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. दरम्यान, 'फ्लाइटराडर२४'च्या आकडेवारीनुसार, संबंधित विमान (IX1810) ठरलेल्या वेळेपेक्षा १४ मिनिटे उशिराने रवाना झाले. मात्र, या घटनेनंतर कमलेश राय आणि त्यांच्या पत्नीला विमानात प्रवास करू दिला गेला की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Varanasi airport accidental firing
Gold Treasure Found : नाल्याच्या खोदकामावेळी सापडली ८५ कोटींची सोन्याची बिस्किटे अन् दुर्मिळ नाणी! नेमका कोणाचा आहे हा खजिना?

विमानातून शस्त्रास्त्रे नेण्याबाबतचे नियम काय सांगतात?

  • विमानातून कायदेशीररित्या शस्त्र न्यायचे असल्यास ते पूर्णपणे अनलोड (गोळ्या काढून) केलेले असावे आणि मजबूत, लॉक असलेल्या बॉक्समध्ये ठेवलेले असावे.

  • चेक-इन काउंटरवर वैध परवान्यासह शस्त्राची स्पष्ट माहिती देणे बंधनकारक आहे.

  • एक प्रवासी स्वतःच्या नोंदणीकृत बॅगेजमध्ये केवळ एक परवानाधारक रिव्हॉल्व्हर, पिस्तूल किंवा शॉटगन आणि ५० काडतुसे नेऊ शकतो.

  • अंतर्गत (डोमेस्टिक) उड्डाणांसाठी प्रति शस्त्र आणि ५० काडतुसांसाठी सुमारे ५,००० रुपये (कर अतिरिक्त) इतके हाताळणी शुल्क आकारले जाते, तर आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी हे शुल्क साधारण १०० डॉलर इतके आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news