Joshimath Helicopter Crash : ऑरेंज अलर्ट असतानाही हेलिकॉप्टरला उड्डाणाची परवानगी का? अवघ्या १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

ऑरेंज अलर्ट असतानाही हेलिकॉप्टर उडालं कसं? जोशीमठ दुर्घटनेनंतर नियमांच्या पालनावर प्रश्नचिन्ह
Joshimath Helicopter Crash
Joshimath Helicopter Crash : ऑरेंज अलर्ट असतानाही हेलिकॉप्टरला उड्डाणाची परवानगी का? अवघ्या १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?file photo
Published on: 
Updated on: 

uttarakhand there was orange alert how helicopter crashes in joshimath big reason

पुढारी ऑनलाईन : उत्तराखंडमध्ये हवामान विभागाने चमोलीसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला होता. अशा परिस्थितीत खराब हवामान असतानाही हेलिकॉप्टरच्या उड्डाणाला परवानगी का देण्यात आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विकास प्राधिकरणाच्या (यूकाडा) म्हणण्यानुसार, हेलिकॉप्टरने उड्डाण केले तेव्हा हवामान स्वच्छ होते. मात्र, खोऱ्यात अचानक हवामान बदलले. त्यामुळे उड्डाणानंतर अवघ्या १५ मिनिटांतच हेलिकॉप्टरचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला.

Joshimath Helicopter Crash
ISRO NVS-03: इस्रोची ऐतिहासिक झेप! NVS-03 उपग्रह यशस्वीरीत्या अवकाशात प्रस्थापित; सामान्य नागरिकांना काय होणार फायदा?

हवामान विभागाने जारी केला होता अलर्ट

आपत्ती नियंत्रण कक्षाच्या माहितीनुसार, हवामान विभागाने शुक्रवारी चमोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याची आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली होती. या पार्श्वभूमीवर चमोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने संबंधित सर्व विभागांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले होते. असे असतानाही डेहराडूनहून बद्रीनाथ आणि बद्रीनाथहून डेहराडूनकडे जाणाऱ्या हेलिकॉप्टरच्या उड्डाणाला परवानगी देण्यात आली. त्यामुळे या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या हेलिकॉप्टर अपघातामुळे हवाई वाहतूक कंपन्यांकडून हवामानासंबंधी नियमांचे आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जाते की नाही, यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Joshimath Helicopter Crash
Sonam Wangchuk : 'प्रत्येकाने एकदा तरी तुरुंगात जायला पाहिजे', गुन्हा केल्याबद्दल नव्हे, तर...

डीजीसीएच्या नियमांनुसार, खराब हवामानात उड्डाणाला परवानगी दिली जात नाही. शुक्रवारी बद्रीनाथमध्ये सकाळपासूनच हवामान खराब होते. दुपारी काही काळ ढग दूर झाले होते. याच दरम्यान हेलिकॉप्टरने उड्डाण केले. मात्र, काही वेळातच हेलिकॉप्टरचा अपघात झाला. त्यानंतर उड्डाण केलेले दुसरे हेलिकॉप्टर सुरक्षितपणे डेहराडूनला पोहोचले.

काही मृतदेह जळालेल्या अवस्थेत, तर काही छिन्नविछिन्न अवस्थेत आढळले

दरम्यान, हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचे मृतदेह लष्कराने ताब्यात घेतले आहेत. ज्योतिर्मठचे उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) चंद्रशेखर वशिष्ठ यांनी सांगितले की, काही मृतदेह जळालेल्या अवस्थेत, तर काही छिन्नविछिन्न अवस्थेत आढळले आहेत. सर्व मृतदेह शनिवारी ज्योतिर्मठ येथे आणले जातील, असेही त्यांनी सांगितले. अपघातस्थळ वनक्षेत्रात असल्यामुळे लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस, आयटीबीपी आणि प्रशासनाची पथके पायी जाऊन मृतदेह तेथून आणणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.