Uttarakhand Helicopter Crash |उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटना; बेंगळुरूतील पाच प्रवाशांचा मृतांमध्ये समावेश

मृतांमध्ये बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील पोलीस इन्स्पेक्टर साळुंखे यांचा समावेश
Bengaluru Passengers Killed in Uttarakhand Chopper Accident
Bengaluru Passengers Killed in Uttarakhand Chopper AccidentPudhari
Published on: 
Updated on: 

Bengaluru Passengers Killed in Uttarakhand Chopper Accident

काशिनाथ सुळकुडे

कर्नाटक : उत्तराखंडमधील बद्रीनाथ धामावरून परतणाऱ्या एका हेलिकॉप्टरला चमोली जिल्ह्यातील जोशीमठजवळ भीषण अपघात झाला आहे. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यामध्ये वैमानिकासह एकूण ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांपैकी पाच जण कर्नाटकातील असून यातील पोलीस इन्स्पेक्टर साळुंखे हे बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील आरटाळ गावचे रहिवासी आहेत.

हे हेलिकॉप्टर 'ट्रान्स भारत' (Trans Bharat) कंपनीचे असून त्याचा नोंदणी क्रमांक VT-HCX असा होता. अपघातात ठार झालेले ५ प्रवासी बेंगळुरूचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

Bengaluru Passengers Killed in Uttarakhand Chopper Accident
Uttarakhand Helicopter Missing: जोशीमठाच्या डोंगरात हेलिकॉप्टर बेपत्ता! पायलटसह 6 जणांचा शोध सुरू; नेमकं काय घडलं?

अपघातातील मृतांची नावे:

हिमांशू (वैमानिक)

अरुण साळुंखे (सीसीबी पोलीस निरीक्षक, बेंगळुरू)

के. सुधीर (वकील, बेंगळुरू)

शंकरेगौडा (वकील, बेंगळुरू)

एच. एस. नटराज (वकील, बेंगळुरू)

प्रताप (बेंगळुरू)

बेंगळुरूच्या ५ जणांवर काळाचा घाला:

बेंगळुरूचे पोलीस निरीक्षक अरुण साळुंखे हे त्यांचे वकील मित्र सुधीर, शंकरेगौडा, एच. एस. नटराज आणि प्रताप यांच्यासोबत उत्तराखंड दौऱ्यावर गेले होते. बद्रीनाथ धामचे दर्शन घेऊन परतत असताना जोशीमठजवळ काळाने त्यांच्यावर झेप घेतली.

मृत अरुण साळुंखे हे २००७ च्या बॅचचे अधिकारी असून सध्या बेंगळुरूच्या गुन्हे शाखेत (CCB) पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी इंदिरानगर आणि बाणसवाडी पोलीस ठाण्यातही सेवा बजावली होती. ते राममूर्ती नगर भागात राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.