Viral Video: मुलांच्या भविष्याचा सत्यानाश! शाळेत मुख्याध्यापिका विद्यार्थ्यांकडून करून घेते मालिश; व्हिडिओ व्हायरल

primary school headmistress body massage viral video: एका मुख्याध्यापिकेने वर्गातील चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून स्वतःची अंगमसाज करून घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
primary school headmistress body massage viral video
primary school headmistress body massage viral videofile photo
Published on
Updated on

primary school headmistress body massage viral video:

लखनौ: उत्तर प्रदेशातील एका सरकारी प्राथमिक शाळेतून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका मुख्याध्यापिकेने वर्गातील चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून स्वतःची अंगमसाज करून घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

primary school headmistress body massage viral video
LPG price hike: सर्वसामान्यांना महागाईचा मोठा चटका! घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरचे दर भडकले, आजपासून नवीन दर लागू

हा प्रकार जिल्हा मुख्यालयातील 'बीआरसी' परिसरातील 'प्राथमिक विद्यालय नया बाजार भाग-१' मध्ये घडला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संबंधित मुख्याध्यापिका जमिनीवर आरामात झोपल्या असून मोबाईलध्ये व्यस्त आहेत. त्याच वेळी, त्यांच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या काही लहान मुली त्यांचे हात-पाय दाबताना दिसत आहेत. शाळेसारख्या पवित्र ठिकाणी जिथे मुलांच्या सुरक्षिततेची आणि संस्कारांची जपणूक होणे अपेक्षित आहे, तिथे असा प्रकार घडल्याने पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

ही शाळा ज्या परिसरात आहे, तिथेच गट शिक्षणाधिकाऱ्यांचे कार्यालय आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कार्यालयाजवळच अशा प्रकारचा अनाचार सुरू असताना प्रशासनाला याची पुसटशी कल्पना कशी आली नाही? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. सुरुवातीला आपल्याला अशा कोणत्याही प्रकाराची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले, मात्र प्रकरणाचे गांभीर्य पाहून आता या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

व्हायरल व्हिडिओ येथे पाहा:

primary school headmistress body massage viral video
Viral Video: सुसाट मर्सिडीज, बोनेटवर ट्रॅफिक पोलीस आणि १ किलोमीटरचा मृत्यूचा प्रवास; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news