

Viral News:
उत्तर प्रदेश : गर्लफ्रेंडला भेटायला गेलेल्या तरुणाला तिच्या घरच्यांनी पकडलं. नग्न करून गरम तव्यावर बसवले, त्यानंतर केवळ क्रूरपणे मारहाणच केली नाही, तर त्याच्यासोबत अशी अमानुषता केली गेली, जी ऐकून थक्क व्हाल. लखीमपूर खेरी जिल्ह्यात ही भयानक घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हा प्रकार मोहम्मदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भरीगवां गावात घडला आहे. येथील रहिवासी राजू यादव याचे एका महिलेशी प्रेमसंबंध होते. त्या महिलेच्या पतीचं निधन झालं आहे. २४ सप्टेंबरच्या रात्री महिलेने राजू यादवला घरी भेटायला बोलावले होते. राजू तिथे पोहोचताच, महिलेच्या कुटुंबीयांना याची कुणकुण लागली आणि त्यांनी त्याला पकडले. राजूला पकडल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला नग्न केले. त्यानंतर त्याचं जबरदस्तीने मुंडन करण्यात आलं आणि मग त्याला गरम तव्यावर बसवण्यात आलं. यामध्ये तो गंभीररित्या भाजला. एवढ्यावरच न थांबता घरच्यांनी तरुणासोबत आणखीन अमानवीय कृत्य केले, त्याच्या तोंडावर लघवी देखील केली. या दरम्यान उपस्थित असलेल्या काही लोकांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ बनवला, जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या प्रकरणाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत महिलेच्या कुटुंबातील पाच लोक सामील असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी महिलेकडील सत्येंद्र यादव, पुनीत यादव, जसविंद, जितेंद्र आणि सुमित यादव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.