

पुढारी ऑनलाईन डेस्क - अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प २०२५ सादर करत आहेत. त्यांनी महिला उद्योजकांसाठी घोषणा केली. ५ लाख एससी एसटी महिला उद्योजकांसाठी २ कोटी रुपयांपर्यंतचं टर्म लोन दिलं जाईल. स्टँड अप इंडिया योजनेतील यशानंतर ही योजना राबवली जात आहे. सरकार पहिल्यांदा उद्योग सुरू करण्यासाठी ५ लाख महिलांना एससी आणि एसटी उद्योजिकांना २ कोटी रुपयांचे टर्म लोन देणार आहे. या नव्या योजनेंतर्गत सरकार ऑनलाईन क्षमता निर्माण कार्यक्रमदेखील सादर करेल.