

पुढारी ऑनलाईन डेस्क - अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना एक महत्त्वाचा मुद्दा हाताळला. त्यांनी गिग वर्कर्स आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म कामगार यांना ओळखपत्र देणार असल्याचे सांगितले. त्यांची ई श्रम पोर्टलवर नोंदणी होणार आणि जन आरोग्य योजनेतून उपचारही मिळणार असल्याचे जाहीर केले. तब्बल १ कोटी गिग वर्कर्सना याचा फायदा होणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
गिग वर्कर म्हणजे असे व्यवसायिक असतात, ज्यांची कामे ही ऑडरप्रमाणे चालतात. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काम करणारेदेखील यामध्ये येतात. यामध्ये स्टँडअप कॉमेडियन, लेखक, अभियंते यांचा समावेश असतो.
स्वतंत्रपणे काम करणारे कर्मचारी
ऑनलाईन प्लॅटफॉर्मसाठी काम करणारे कर्मचारी
ठेका योग्य कर्मचारी
कॉलवर कामासाठी उपलब्ध कर्मचारी
अस्थायी कर्मचारी
या सर्वांचा समावेश गिग वर्करमध्ये होतो
मीडिया रिपोर्टनुसार, भारतात गिग वर्कर्सची स्थिती भारतामध्ये ऑनलाईन बिझनेस वाढल्यानंतर गिग वर्कर्सच्या संख्येत वाढ झाली आहे. भारतात अधिकतर गिग वर्कर ऑनलाईन फूड प्लॅटफॉर्म, ई-कॉमर्स कंपन्या आणि साहित्य डिलीव्हरी सारख्या कामांशी जोडले गेले आहेत. अनेक गिग वर्कर्स ड्रायव्हिंगशी संबंधित देखील आहेत.
ऑनलाईन कंपन्यांसाठी काम करणारे गिग वर्कर्स महत्वाचे आहेत. जे ऑनलाईन सामान-साहित्या विकणाऱ्या कंपन्यांसाठी काम करतात. ग्राहकांना त्यांच्या वेळेत साहित्य पोहोचवण्याचे काम या कंपन्या करतात. त्या कंपन्या गिग वर्कर्सच्या माध्य़मातून हे काम पार पाडतात.