खूप रडायचे, पोटात दुखायचं तरीही..; ६३ वर्षीय शिक्षकाचा १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक खुलासा

Rape Case: खासगी क्लास घेणाऱ्या एका ६३ वर्षीय शिक्षकाने १३ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला.
Rape Case
Rape Casefile photo
Published on
Updated on

Rape Case

भरूच: खासगी क्लास घेणाऱ्या एका ६३ वर्षीय शिक्षकाने १३ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला. नराधम शिक्षकाच्या या कृत्यामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली. गुजरातच्या भरूचमध्ये ही खळबळजनक घटना समोर आली आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले आहे.

Rape Case
Crime News: "तू रोज येत जा, ५००० रुपये देईन..." सरपंचाच्या पतीची अल्पवयीन मुलीला अश्लील ऑफर

नेमकं प्रकरण काय?

भरूच जिल्ह्यातील अंकलेश्वर तालुक्यातील एका गावात राहणारी १३ वर्षांची विद्यार्थिनी ६३ वर्षीय शिक्षकाच्या घरी क्लाससाठी जात होती. तो वृद्ध शिक्षक 'एक्स्ट्रा क्लास'च्या बहाण्याने दर रविवारी विद्यार्थिनीला एकटीलाच घरी बोलवत असे. याच दरम्यान आरोपी शिक्षकाने विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला.

भीतीपोटी मुलगी राहिली शांत

पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी शिक्षकाने हे कृत्य केल्यानंतर याबद्दल कोणालाही काहीही न सांगण्याची धमकी दिली होती. शिक्षकाच्या या घृणास्पद कृत्यामुळे घाबरलेल्या मुलीने सुरुवातीला या घटनेबद्दल कोणालाही काही सांगितले नाही.

तपासणीत सत्य आले समोर

काही काळानंतर मुलीने पोटात दुखत असल्याचे आई-वडिलांना सांगितले. त्यानंतर तिला एका महिला डॉक्टरकडे नेण्यात आले, जिथे तपासणीनंतर मुलगी गर्भवती असल्याचे समजले. हे समजताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. मुलगी दीड महिन्यांची गर्भवती होती. त्यानंतर जेव्हा तिला विश्वासात घेऊन विचारले गेले, तेव्हा तिने घडलेल्या संपूर्ण घटनेचा खुलासा केला.

या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रार दाखल होताच पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे. तो गेल्या ४ वर्षांपासून ट्युशन शिकवण्याचे काम करत होता. त्याच्यावर बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rape Case
Crime News: धक्कादायक! तरुणीवर धावत्या व्हॅनमध्ये ३ तास लैंगिक अत्याचार, नंतर नराधमांनी गाडीतून रस्त्यावर फेकले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news