AI चं नवं जग ! Google ने आणले नवीन 7 मोठे अपडेट्स

Google I/O 2025 इव्हेंटमध्ये Googleने सादर केले एआयच्या जादूने झपाटलेलं भविष्य
Google I/O 2025
Google I/O 2025File Photo
Published on
Updated on

Google I/O 2025 या बहुप्रतीक्षित इव्हेंटमध्ये Google ने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित अनेक अद्वितीय नवकल्पना सादर केल्या. या नवकल्पनांमुळे तंत्रज्ञानाचे भवितव्य कसे असेल याची झलक मिळाली आहे. एआय ओव्हरव्ह्यूमुळे आता गुगल सर्च अधिक उपयुक्त होणार आहे.

गुगल दरवर्षी Google I/O (गुगल आय/ओ) कार्यक्रमात आपले नवीन कल्पनांसह नवीन तंत्रज्ञान जगासमोर आणते. यावेळी गुगलने आर्टिफिशियल इंटेलिजेंसला (एआय) केंद्रस्थानी ठेवून अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. कंपनीने भविष्य कसे असेल हे दाखवून दिले, जिथे यंत्रे केवळ प्रतिसाद देणार नाहीत, तर विचार करतील, समजून घेतील आणि मानवी जीवन देखील सोपे करतील. Google इव्हेंटमधील अशाच काही नवीन तंत्रज्ञान आणि एआय 7 मोठे आणि महत्त्वाचे अपडेट्स

Google I/O 2025
Google I/O 2025: गूगल आपल्या डिजिटल युगात काय बदल घडवणार?

1. Gemini 2.5 – गूगलचा सर्वात शक्तिशाली AI मॉडेल

Google ने त्यांच्या एआय मॉडेलची प्रगत आवृत्ती जेमिनी २.५ सादर केली आहे. Gemini 2.5 केवळ टेक्स्टच नव्हे तर फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ इनपुट्स समजून घेऊ शकतो. "डीप थिंक" फिचरमुळे हे मॉडेल दीर्घ आणि गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकते. भविष्यात Gemini 2.5 हे Gmail, Docs, Sheets, Slides, Calendar, Meet यांसारख्या Google उत्पादनांमध्ये समाविष्ट केले जाईल, जेणेकरून लोक त्यांचे काम जलद आणि सुलभपणे पूर्ण करू शकतील.

2. Gemini in Chrome – स्मार्ट ब्राउझिंगचा अनुभव

जेव्हा तुम्ही वेबसाइट उघडता तेव्हा जेमिनी तुम्हाला त्या वेब पेजची माहिती, सारांश आणि महत्त्वाचे मुद्दे त्वरित समजावून सांगेल. हे वैशिष्ट्य विशेषतः इंटरनेटवर माहिती शोधणाऱ्या विद्यार्थी, पत्रकार आणि संशोधकांसाठी उपयुक्त आहे.

Google I/O 2025
तंत्रज्ञानाची शैली बदलणार, Google देणार नव्या युगाचा मंत्र !

3. AI Overview – Google सर्चसाठी एक नवीन अनुभव

आता जर तुम्ही गुगलवर काहीतरी शोधले तर तुम्हाला केवळ लिंकच मिळणार नाही तर एआयच्या मदतीने एक संक्षिप्त आणि अचूक उत्तर देखील मिळेल, ज्याला एआय ओव्हरव्ह्यू म्हणतात. जसे - मुलांसाठी सर्वोत्तम खाण्याचा आराखडा कोणता असू शकतो? तर एआय सविस्तर उत्तर देईल ज्यामध्ये अन्न, वेळ आणि आरोग्य टिप्स देखील समाविष्ट असतील. यामुळे इंटरनेटवर माहिती शोधण्यात लागणारा वेळ वाचेल. कोणत्याही महत्त्वाच्या माहितीसाठी तुम्हाला संपूर्ण लेख वाचण्याची आवश्यकता नाही.

4. Project Astra – कॅमेऱ्याच्या मदतीने संवाद करणारा सहाय्यक

Project Astra हा AI असिस्टंट कॅमेऱ्याद्वारे वस्तू पाहतो आणि त्यावर उत्तर देतो. उदाहरणार्थ, एखादा दिवा का चालू नाही हे समजून सांगतो – प्लग बसलेला नाही की बल्ब खराब आहे, याचेही तो उत्तर देऊ शकतो. हा भविष्याचा सहाय्यक आहे, जो केवळ बोलू शकत नाही तर गोष्टी पाहू आणि समजू देखील शकतो आणि तेही रिअल टाइममध्ये.

Google I/O 2025
Cyber Security Tips 2025 | पासवर्डपेक्षा पासकी अधिक सुरक्षित; Google चा दावा

5. Android XR – Gemini युगातील पहिले अँड्रॉइड प्लॅटफॉर्म

Android XR हे जेमिनी युगातील पहिले अँड्रॉइड प्लॅटफॉर्म आहे. ते स्मार्ट ग्लासेस आणि हेडसेटसाठी डिझाईन करण्यात आला असून, Gemini AIशी पूर्णतः जोडलेला आहे. त्याचा उद्देश युजर्सचे दृश्य इनपुट आणि आजूबाजूचे वातावरण समजून घेणे आणि रिअल टाइममध्ये प्रतिसाद देणे हा आहे. या प्लॅटफॉर्मचे वैशिष्ट्य म्हणजे ते युजर्सचा दृष्टिकोन समजून घेऊन त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकते.

6. Google Beam – व्हिडिओ कॉलचा नवा अनुभव

Google Beam हे प्रगत व्हिडिओ कॉलिंग तंत्रज्ञान आहे. हे UHD व्हिडिओ कॉलला सपोर्ट करते. व्यावसायिक बैठका, ग्राहक सेवा आणि व्हर्च्युअल मुलाखती यासारख्या प्रसंगी हे तंत्रज्ञान गेम चेंजर ठरू शकते. HP (Hewlett-Packard) सारख्या हार्डवेअर ब्रँडच्या सहकार्याने ते बाजारात आणले जात आहे.

Google I/O 2025
Google घेऊन येतंय धमाकेदार फिचर; आता खिशात फोन नाही, तर 'कंप्युटर'

7. Google Veo आणि Imagen 4 – AI जनरेटेड व्हिडिओ व फोटो

गुगलने Veo आणि Imagen 4 ही दोन क्रिएटिव्ह टूल्स सादर केली आहेत. हे Veo व्हिडिओ जनरेट करते. जर तुम्ही त्याला सांगितले की मला सूर्यास्ताच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर चालणाऱ्या मुलीचा व्हिडिओ हवा आहे तर तो काही सेकंदातच एक सुंदर १०८०p दर्जाचा व्हिडिओ देईल. हे टूल YouTubers, चित्रपट निर्माते आणि सोशल मीडिया निर्मात्यांसाठी खूप उपयुक्त आहे. इमेजेन ४ च्या मदतीने तुम्ही टेक्स्टद्वारे कमांड देऊन फोटो तयार करू शकता. त्याची फोटो क्वालिटी अप्रतिम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news