

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशाच्या आणि देशवासीयांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक दहशतवादी मॉड्यूलच्या केंद्र सरकारने पुढचं पाऊल टाकत 'लष्कर-ए-तोयबा', 'जैश-ए-मोहम्मद' यांसारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित २३ जणांना दहशतवादी म्हणून घोषित केले.
यात १७ पाकिस्तानी, तर ६ भारतीय नागरिकांचा समावेश आहे. भारतविरोधी कारवाया, दहशतवादी हल्ले, दहशतवादाला खतपाणी घालणे, शस्त्रास्त्रांची तस्करी, सीमापार घुसखोरी, दहशतवादी संघटनांना मदत, निधी उभारणी आणि दहशतवाद्यांची भरती यामध्ये सहभाग, असे ठपके या सर्वांवर ठेवण्यात आले आहेत. हे सर्वजण सध्या पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधून दहशतवादी कारवाया चालवत आहेत.
भारत सरकारचा हा निर्णय दहशतवाद्यांची निधी उभारणी, हालचाली, भरती क्षमता आणि दहशतवादाशी संबंधित कारवायांना आळा घालून संपूर्ण दहशतवादी इको-सिस्टीम (परिसंस्था) उद्ध्वस्त करण्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या २३ जणांत सर्वाधिक खतरनाक मानले जाणारे 'टॉप १०' दहशतवादी पुढीलप्रमाणे...
मसूद इलियास काश्मिरी
जैश-ए-मोहम्मद' संघटनेशी संबंधित पाकिस्तानी नागरिक, मौलाना मसूद अझहरचा निकटवतीय, काश्मिरात घुसखोरी घडवून आणणारा प्रमुख समन्वयक. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना दहशतवादी संघटनांमध्ये भरतीसह दहशतवादासाठी निधी गोळा करण्यात सक्रिय, एप्रिल २०२२ मध्ये जम्मूच्या सुंजवान येथील पीडीपी कार्यालयाजवळील पोलिस चौकीवर झालेल्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार.
मोहम्मद मुसादिक
'जैश-ए-मोहम्मद'चा हस्तक पाकिस्तानी नागरिक, लासियाकोट सेक्टरचा लॉचिंग कमांडर, भुयारांच्या माध्यमातून सीमापार घुसखोरी करण्यात माहीर. ड्रोनच्या सहाय्याने भारतात शरूो व दारूगोळा पाठवला. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी संकुल, नागपुरातील रा. स्व. संघ मुख्यालय व पानिपतस्थित आयओसीएल रिफायनरी यासारख्या मोक्याच्या ठिकाणांची रेकी केली.
मुफ्ती मोहम्मद असघर खान
'जैश-ए-मोहम्मद'चा हस्तक. पाकिस्तानी नागरिक, पाकव्याप्त काश्मिरातील 'जैश'चा 'अमीर' (प्रमुख) आणि तिच्या लष्करी शाखेचा प्रमुख. जम्मूच्या नगरोटात भारतीय लष्कराच्या छावणीवरील हल्ल्याच्या कटाचा सूत्रधार. मुझफ्फराबादेत दहशतवाद्यांना जिहादी व लष्करी प्रशिक्षण देण्यासाठी कॅम्प चालवतो.
हाफिज अब्दुल शकूर
पाकिस्तानी नागरिक, 'जैश-ए-मोहम्मद' आणि 'हरकत-उल-मुजाहिद्दीन' शी जोडलेला. नगरोटा लष्करी छावणीवरील हल्ल्यासाठी सांबा-कठुआ सेक्टरमधून तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या घुसखोरीची व्यवस्था केली. १२२५-२६ दरम्यान अफगाण युद्धात सहभाग. 'आयएसआय'च्या मदतीने दहशतवादी कारवायांचे संयोजन, 'जैश'च्या गव्हर्निंग कौन्सिलचा (शूरा) सदस्य.
अब्दुल्ला जिहादी
'जैश-ए-मोहम्मद'चा सदस्य. पाकिस्तानी नागरिक, मुफ्ती असगर खानचा सह-कटकारस्थानी. उत्तर काश्मिरात दहशतवाद्यांच्या घुसखोरीला मदत. भारत सरकारविरुद्ध द्वेष व असंतोष भडकावण्यात अग्रेसर, कुपवाड़ा व बारामुलना जिल्ह्यांतील अनेक लॉचिंग कॅम्पचा व्यवस्थापक.
फिरदौस अहमद
भारतीय नागरिक (सध्या पाकिस्तानात), 'लष्कर-ए-तोयबा 'चा लॉचिंग कमांडर. २००८ मध्ये वाघा बॉर्डरद्वारे पाकिस्तानात गेला. परदेशी दहशतवाद्यांना नियंत्रण रेषा पार करून भारतात आणतो. ओव्हर साऊंड वर्कर्सना शो पुरवणे व दक्षिण काश्मिरातील तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये भरती करण्यात पुढे.
बिलाल अहमद भीर
भारतीय नागरिक (सध्या मुझफ्फराबाद, पाकव्याप्त काश्मिरात राहतो). 'लष्कर-ए-तोयबा' व 'द रेझिस्टन्स फ्रंट' शी संबंधित. पाकमध्ये राहून काश्मिरी तरुणांना जिहादमध्ये सामील होण्यासाठी चिथावणी. काश्मीर खोऱ्यात शो, दारूगोळा व रसद यांच्या बेकायदेशीर पुरवठा साखळीचे व्यवस्थापन करतो.
गुलाम फरीद
पाकिस्तानी नागरिक, 'जैश-ए-मोहम्मद 'शी संबंधित. २००१ ते २००५ दरम्यान पाकिस्तानी सैन्यात सेवा, सप्टेंबर २००८ मध्ये बांगला देशमार्गे भारतात बेकायदेशीर प्रवेश, डिसेंचर २००८ मध्ये जासूत अटक जुलै २०१२ मध्ये पाकिस्तानात परत पाठवले
हारुण रशीद गनाई
भारतीय नागरिक (सध्या पाकिस्तानात). 'लष्कर-ए-तोयबा'शी संबंधित. मार्च २०१८ मध्ये पाकिस्तानात जाऊन 'लष्कर-ए-तोयबा मध्ये सामील. काश्मीर खोऱ्यातील तरुणांना दहशतवादी संघटनांत सामील होण्यासाठी चिथावणी. दहशतवादी कारवायांसाठी ओव्हर ग्राऊंड वर्कर्सना शस्त्रे, दारूगोळा पुरवतो.
आबिद कयूम लोन
भारतीय नागरिक (सध्या पाकव्याप्त काश्मिरात वास्तव्य). 'लष्कर-ए-तोयबा'शी संबंधित. फेब्रुवारी २०२० मध्ये अटारी चेक पोस्टवरून पाकमध्ये गेला. जम्मू-काश्मिरात सुरक्षा दलांवर हल्ल्यांचे नियोजन, लष्करसाठी निधी गोळा करण्यात सामील. नियंत्रण रेषेवर कार्यरत सिंडिकेटच्या माध्यमातून पाळमधून भारतात अंमली पदार्थांची तस्करी.