Crime News: प्रेयसीसोबतच्या डिलीट चॅटने गुपित उघड; पत्नीच्या हत्येप्रकरणी तेलंगणातील इंजिनिअरला अमेरिकन पोलिसांनी कसं पकडलं?

Telangana software engineer wife killed case: अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यात पत्नीच्या हत्येप्रकरणी तेलंगणातील सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक करण्यात आली आहे.
Avinash Narne, Rajitha Sabbineni
Avinash Narne, Rajitha Sabbineni file photo
Published on
Updated on

Telangana software engineer wife killed case

वॉशिंग्टन: अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यात पत्नीच्या हत्येप्रकरणी तेलंगणातील सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक करण्यात आली आहे. त्याने आधी पत्नीचे अकस्मात निधन झाल्याचे चित्र उभे केले होते. मात्र शवविच्छेदन अहवाल, डिलीट केलेले कॉल-चॅट, भारतातील एका तरुणीसोबतचे कथित प्रेमसंबंध आणि संशयास्पद डिजिटल पुराव्यांमुळे या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले.

अविनाश नार्ने (वय ३०) असे संशयित आरोपी सॉफ्टवेअर इंजिनिअरचे नाव आहे. तर राजिता सब्बिनेनी (वय २७) असे मृत पत्नीचे नाव आहे. वॉशिंग्टनमधील बेलव्ह्यू येथे २७ ऑक्टोबर २०२५ रोजी ही घटना घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश नार्नेने पोलिसांना फोन करून आपण बाहेरून परतल्यावर पत्नी बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळल्याचे सांगितले. ती चुकून बाथरूममध्ये अडकली होती, असा दावा त्याने केला होता. त्यानंतर पोलिसांनी बाथरूमचा दरवाजा तोडून राजिताला बाहेर काढले आणि रूग्णालायात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

Avinash Narne, Rajitha Sabbineni
Panvel Crime | लग्नासाठी तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा खून; मृतदेह जाळून पुरावा नष्ट करणारा प्रियकर अटकेत

तपासादरम्यान आलेल्या शवविच्छेदन अहवालाने मात्र, संपूर्ण प्रकरणाला कलाटणी मिळाली. अहवालात राजिताचा मृत्यू गळा आवळल्यामुळे श्वास गुदमरून झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी अविनाशच्या हालचाली आणि डिजिटल पुराव्यांचा तपास सुरू केला. पोलीस तपासात समोर आले की, अविनाशचे भारतातील एका तरुणीसोबत कथित प्रेमसंबंध होते. पत्नीच्या मृत्यूच्या दिवशी त्याने त्या तरुणीला अनेक वेळा फोन केला होता. एवढेच नव्हे, तर पत्नीच्या मृतदेहाचा फोटोही त्याने त्या तरुणीला पाठवला होता.

तपासात आणखी एक महत्त्वाचा पुरावा म्हणजे राजिताने तिच्या मैत्रिणीसोबत केलेले चॅट. मृत्यूपूर्वी काही दिवस आधी तिने पतीने बनवून दिलेल्या स्मूदीची चव "कफ सिरपसारखी कडू" असल्याचे सांगितले होते. मृत्यूच्या दिवशीही तिने अविनाशलाच स्मूदीची चव कडू लागल्याचा मेसेज पाठविला होता. या मेसजमुळे संशय आणखी वाढला.

अमेरिकन पोलिसांच्या मते, अविनाशचे भारतातील एका तरुणीसोबत विवाहानंतरही संपर्क कायम होता. ५ जून २०२५ रोजी झालेल्या अविनाश आणि राजिताच्या विवाहालाही ती तरुणी उपस्थित होती. विवाहानंतर राजिता टेक्सासहून सिएटल परिसरात पतीसोबत राहण्यासाठी आली होती.

न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार, राजिताच्या मृत्यूच्या दिवशी अविनाशने त्या तरुणीला किमान चार वेळा फोन केला होता. त्यापैकी काही कॉल त्याने बाथरूममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केलेल्या वेळेच्या आसपास झाले होते. तसेच नंतर डिलीट केलेल्या मेसज बाबत चौकशी झाल्यानंतर पत्नीच्या मृतदेहाचा फोटो पाठवल्याची कबुली त्याने दिली आहे.

राजिताच्या अंत्यसंस्कारासाठी मदत करणाऱ्या अमेरिकेतील तेलुगू समाजातील स्वयंसेवकांनी सांगितले की, सुरुवातीला अविनाश आणि त्याच्या मित्रानेच अंत्यविधीसाठी संपर्क साधला होता. त्यावेळी हे हत्या प्रकरण असल्याची किंवा अविनाशवर संशय असल्याची कोणतीही कल्पना नव्हती. नंतर पोलिसांनी केलेल्या खुलाशानंतर सर्वांनाच धक्का बसला. स्वयंसेवकांच्या म्हणण्यानुसार, त्यांना सांगण्यात आले होते की, २७ ऑक्टोबरच्या सकाळपासून राजिताची तब्येत बिघडली होती. तिने संध्याकाळी आई-वडिलांशी आणि पतीशी फोनवर संवाद साधल्यानंतर बाहेरून औषधे आणि जेवण मागवण्यास सांगितले होते. अविनाश ते आणण्यासाठी बाहेर गेला आणि परतल्यावर ती बाथरूममध्ये प्रतिसाद देत नव्हती. त्यानंतर मित्राला आणि ९११ ला फोन करण्यात आला. पोलिसांनी दरवाजा तोडून तिला बाहेर काढले आणि सुमारे ३० मिनिटे सीपीआर दिला, मात्र तिचा मृत्यू झाला.

Avinash Narne, Rajitha Sabbineni
Shocking News : पतीने 'DNA' टेस्टचा आग्रह धरताच ५ महिन्यांच्या गर्भवती पत्नीने संपवले जीवन; संशयाने घेतले दोन जीव!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news