TMC च्या चिन्हावर कोणाचा हक्क? पोटनिवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाकडून दोन्ही बाजूंची सुनावणी

TMC Party Symbol Dispute : पक्षाचे नाव आणि चिन्‍हावरुन दोन गटांमधील संघर्षावर निर्णय
TMC Party Symbol Dispute
TMC Party Symbol Dispute
Published on
Updated on
Summary

६ ऑक्टोबर रोजी नंदीग्राम आणि रेजीनगर या दोन जागांवर होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष चिन्‍ह संदर्भात निवडणूक आयोगाने तृणमूलच्‍या दोन गटांची आज सुनावणी घेतली.

TMC Party Symbol Dispute : तृणमूल काँग्रेसचे (TMC) नाव आणि निवडणूक चिन्हावरून ममता बॅनर्जी आणि रितब्रता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गटांमध्ये संघर्ष सुरू आहे. या वादाबाबत आज (दि. १७ सप्‍टेंबर) निवडणूक आयोगासमोर महत्त्वाची सुनावणी झाली. गुरुवारी दिल्लीत दोन्ही गट आयोगासमोर आपापले युक्तिवाद स्वतंत्रपणे माडले.

पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनावणी

६ ऑक्टोबर रोजी नंदीग्राम आणि रेजीनगर या दोन जागांवर होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची ही सुनावणी घेतली. नंदीग्रामची जागा तेव्हा रिक्त झाली जेव्हा मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी त्या जागेवरून आमदारकीचा राजीनामा दिला; कारण ते दोन मतदारसंघांतून (दुसरा भवानीपूर) विजयी झाले होते. तसेच, नौदा मतदारसंघातूनही विजयी झालेले हुमायून कबीर यांनी राजीनामा दिल्याने रेजीनगरची जागा रिक्त झाली होती.

TMC Party Symbol Dispute
Crude Oil Prices Drop: दिलासादायक! पाईपलाईन हल्ल्यानंतर सौदीने शोधला 'पर्यायी मार्ग'; जागतिक तेलाच्या किमतीत घट

दोन्‍ही गटांची मुख्य निवडणूक आयुक्तांनी घेतली भेट

दोन्ही गटांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे त्यांना निवडणूक चिन्हे वाटप करणे आवश्यक आहे.हे लक्षात घेऊन, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासह निवडणूक आयोगाच्या पूर्ण खंडपीठाने येथील मुख्यालयात दोन्ही गटांची भेट घेतली.सुनावणीदरम्यान, ममता आणि रिताब्रता यांच्या नेतृत्वाखालील गटांनी निवडणूक आयोगाच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

निवडणूक आयोगालाच अंतिम निर्णय घ्यावा लागेल : रिताब्रता बॅनर्जी

निवडणूक आयोगाच्‍या अधिकार्‍यांची भेट घेतल्‍यानंतर रिताब्रता बॅनर्जी म्‍हणाले की, "आम्ही आज निवडणूक आयोगाकडे रेजीनगर आणि नंदीग्राम येथील पोटनिवडणुकीबाबत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांवर म्हणणे मांडले. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. आता पक्षचिन्ह वाटपाचा विषय प्रलंबित आहे. आम्ही 'फॉर्म ए' (Form A) आणि 'फॉर्म बी' (Form B) सादर केले आहेत; मात्र, कालीघाटमधूनही हे फॉर्म्स सादर करण्यात आले आहेत, त्यामुळे आता निवडणूक आयोगालाच अंतिम निर्णय घ्यावा लागेल. आता निवडणूक आयोग आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अखत्यारीत आहे; ते बहुधा आयोगाशी चर्चा करूनच निर्णय घेतील."

TMC Party Symbol Dispute
US Iran war cost : इराणला नष्ट करायला गेले अन् स्वतःच अडकले; युद्धात अमेरिकेने केला तब्बल ३.२० लाख कोटींचा चुराडा!

नंदीग्रामवर लक्ष का आहे?

या संपूर्ण वादात नंदीग्राम मतदारसंघाला विशेष महत्त्व आहे. याच ठिकाणी २००७ मधील जमीन अधिग्रहण विरोधी चळवळीचे रूपांतर एका मोठ्या राजकीय मुद्द्यात झाले होते. राज्यातील राजकारणात टीएमसी (TMC) पक्ष बळकट करण्यात या चळवळीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. या वादाची पहिली मोठी निवडणूक-चाचणी रेजीनगरमध्ये होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news