TMC Crisis: राजकारण लय वंगाळ... ज्यांच्या जिवावर खासदारकी त्यांच्याच पाठीत खंजीर; युसूफ अन् सयानी यांची 'बंडखोरी'वर स्वाक्षरी

TMC Crisis
TMC Crisispudhari
Published on
Updated on

TMC Crisis: पश्चिम बंगालमधील सत्ता गेल्यावर ममतांचे एक एक शिलेदार त्यांच्याविरूद्ध बंडखोरी करू लागले आहेत. आमदारांपाठोपाठ खासदारांनी देखील बंडोखोरी केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या २८ पैकी २० खासदारांनी वेगळा गट स्थापनेचा आणि एनडीएमध्ये सामील होण्यासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं या पत्रावर कोणी स्वाक्षरी केल्या आहेत हे अजूनपर्यंत गुलदस्त्यात होतं. मात्र आता या बंडखोरींची यादीच माध्यमांच्या हाती लागली आहे.

TMC Crisis
TMC crisis | "खासदारकीचा राजीनामा द्या" : ममता बॅनर्जींचा आदेश युसूफ पठाण यांनी धुडकावला!

दोन नावं धक्कादायक

या यादीत युसूफ पठाण आणि सयानी घोष यांची नावे वाचून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सयानी घोष ही कट्टर भाजपविरोधी आणि ममता प्रेमी असल्याचं गेल्या अनेक दिवसांपासून ती भासवत होती. युसूफ पठाणला देखील ममतांच्या कृपादृष्टीमुळेच खासदारकी मिळाली होती. दरम्यान, २० पैकी १९ बंडखोरांची जणांची यादी जाहीर झाली असून या सर्वांनी १८ मे रोजी हे पत्र दिलं आहे. या बंडखोरांचे नेतृत्व काकोली घोष दस्तीदार या करत आहेत.

TMC Crisis
TMC Crisis: वाचायचं असेल तर 'तृणमूल' काँग्रेसमध्ये विलीन करा... सोनिया गांधींचा ममतांना फोन, दिली खास ऑफर

एनडीएला पाठिंबा

तृणमूल काँग्रेस ही २८ खासदारांसह तिसरी सर्वात मोठी विरोधी पार्टी होती. काँग्रेसकडे ९९ तर समाजवादी पक्षाकडे ३७ खासदार आहेत. त्यानंतर तृणमूलचे २८ खासदार असून आता त्यांच्यात बंडाळी माजली आहे.

तृणमूल काँग्रेसच्या बंडखोरांची संख्या ही १९ असून ती पक्षाच्या एकूण खासदारांच्या दोन तृतियांश इतकी आहे त्यामुळे त्यांच्यावर पक्षविरोधी कायदा लागू होत नाही. या बंडखोरांनी एनडीएमध्ये सामील होणार नाही मात्र ते त्यांना पाठिंबा देऊ शकतात अशी भूमिका घेतली आहे.

TMC Crisis
TMC crisis | ममतांसाठी युसूफ पठाणला खासदारकी सोडण्यास सांगितले होते का? सौरव गांगुलीने केला खुलासा

बडंखोर खासदारांची संपूर्ण यादी

  • काकोली घोष दस्तीदार

  • शताब्दी दोय

  • बपी हलदार

  • शर्मिला सरकार

  • शर्मिला बंडोपाध्याय

  • जगदीश बर्मा बासुनिया

  • असित कुमार मल

  • अरूण चक्रवर्ती

  • रिचा बॅनर्जी

  • सयानी घोष

  • खलीलूर रहमान

  • अबू ताहेर खान

  • युसूफ पठाण

  • मिताली बैग

  • माला रॉय

  • कालीपदा सोरेन

  • दीपक अधिकारी

  • जून मालिया

  • पार्थ भौमिक

TMC Crisis
Shatrughan Sinha : कठीण काळात ममता बॅनर्जींनी साथ दिली, आता दु:खाच्या काळात...शत्रुघ्न सिन्हा बंडखोरीवर काय म्हणाले..

तृणमूल काँग्रेसमध्ये पहिल्यांदा बंडखोरी ही आमदारांनी केली असून निलंबीत आमदार रितब्रत बॅनर्जी यांनी दावा केला की ८० पैकी ५८ आमदारांनी त्यांना विरोधीपक्षनेता म्हणून मान्यता दिली आहे.

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या पक्षातील बंडखोरीला सामोऱ्या जात आहेत. भाजपने तृणमूलची १५ वर्षांची सत्ता हिसकावून घेतली असून पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये कमळ उमललं आहे. विशेष म्हणजे राज्य सभेतील खासदार देखील एका पाठोपाठ एक राजीनामे देत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news