TMC Crisis: वाचायचं असेल तर 'तृणमूल' काँग्रेसमध्ये विलीन करा... सोनिया गांधींचा ममतांना फोन, दिली खास ऑफर

TMC Merge With Congress
TMC Merge With Congresspudhari
Published on
Updated on

Sonia Gandhi Offer TMC Merge: पश्चिम बंगालमधील राजकीय परिस्थिती अत्यंत नाजून बनली आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट होण्याची शक्यता निर्माण झाली असून आमदारांपाठोपाठ आता खासदार देखील ममतांची साथ सोडून भाजपच्या बोटीत जाऊन बसण्याची शक्यता आहे.

त्यातच आचा काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी ममता बॅनर्जी यांनी थेट फोन करून तृणमूल काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. भाजपच्या राजकीय हल्ल्यापासून वाचण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याची विनंती सोनिया गांधी यांनी केली आहे.

TMC Merge With Congress
Mamata Banerjee | ममता बॅनर्जी यांचा 'लढू किंवा मरू'चा निर्धार, धरणे आंदोलनात ८० पैकी केवळ ५ आमदार हजर!

तर 'आप'सारखीच अवस्था

तृणमूल काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन न केल्यास तृणमूलची देखील 'आप'सराखी अवस्था करण्याची भाजपची खेळी असल्याचा इशारा सोनिया गांधी यांनी दिला आहे. सोनिया गांधी यांनी ममता आणि अभिषेक यांना काँग्रेस पक्षात मोठं पद देण्याची देखील ऑफर दिली आहे.

TMC Merge With Congress
TMC Crisis: तृणमूल काँग्रेसमध्ये दोन नाही तर आहेत तीन गट... तिसरा 'सायलेंट' किलर गट बंगालचं राजकारण फिरवणार?

ममतांना मोठी ऑफर

तृणमूल काँग्रेसमध्ये अभिषेक बॅनर्जी यांच्याविरूद्ध नाराजी असून एक एक टीएमसी नेते ममतांची साथ सोडून बंडखोर गटाकडे जात आहेत. त्यामुळं ममतांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अशातच सोनिया गांधी यांनी ममता बॅनर्जी यांना मोठी ऑफर देखील दिली आहे.

सोनिया गांधी यांनी ममतांना राष्ट्रीय उपाध्यक्ष करण्याची तसेच अभिषेक बॅनर्जीला महासचिव पदाची ऑफर दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ममता बॅनर्जी यांनी या ऑफरबाबत विचार करण्यासाठी काही दिवसांचा वेळ मागितला आहे.

TMC Merge With Congress
TMC rebel crisis | 'ममता बॅनर्जीच राहतील सर्वोच्च नेत्या': सल्लागार पद मान्य नाही, तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर गटातही बंड

बंडखोरांकडे २० खासदार असल्याचा दावा मात्र..

तृणमूल काँग्रेसचे एकूण २८ खासदार आहेत. त्यातील जवळपास २० खासदार बंडखोरीच्या तयारीत असून ते काकोली घोष यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात एनडीएला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. याबाबतच्या हालचाली त्यांनी सुरू केल्या असून ओम बिर्ला यांना पत्र लिहून त्यांनी आमची वेगळी बसण्याची सोय करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

दरम्यान, जरी २० खासदारांनी अशी मागणी केली असली तरी आतापर्यंत फक्त १४ बंडखोर खासदारांची नावे पुढे आली आहेत. त्यामुळं उरलेल्या ६ खासदारांची काय भूमिका आहे हे अजून गुलदस्त्यात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news