Tamil Nadu firecracker factory
तामिळनाडूतील विरुधूनगर जिल्ह्यात एका फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला. ANI

Tamil Nadu : तामिळनाडूत फटाक्याच्या कारखान्यात स्फोट, ४ जणांचा मृत्यू

विरुधूनगर जिल्ह्यातील घटना
Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क

तामिळनाडूतील विरुधूनगर जिल्ह्यातील सत्तूरजवळ एका फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला आहे. या स्फोटात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेतील जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती विरुधूनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

या दुर्घटनेत सुरुवातीला तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटातील एका जखमींचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ४ वर गेली असल्याचे जिल्ह्याधिकाऱ्यानी सांगितले.

स्फोटामुळे लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी आणि आत अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी आपत्कालीन सेवांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक अधिकाऱ्यांनी स्फोटाचे कारण शोधण्यासाठी आणि कारखान्यात असलेल्या सुरक्षा प्रोटोकॉलचे मूल्यांकन करण्यासाठी तपास सुरू केला आहे.

Tamil Nadu firecracker factory
तामिळनाडू विषारी दारू प्रकरण; मृतांचा आकडा ६१ वर

याआधी घडलेल्या घटना

फेब्रुवारी २०२४ मध्ये विरुधूनगर येथील वेंबकोट्टई जवळ फटाक्यांच्या युनिटमध्ये झालेल्या अपघातात ५ महिलांसह ९ जणांचा मृत्यू झाला होता. तर ७ जण गंभीर जखमी झाले.

Tamil Nadu firecracker factory
राज्‍यपालांविरोधात तामिळनाडू सरकारची सुप्रीम कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?

यापूर्वी २४ जानेवारी रोजी याच जिल्ह्यातील फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या वेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू झाला होता. पी. कलिराज (वय २०) आणि के. वीरकुमार (वय ५०) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना विरुधूनगर जिल्ह्यातील वच्चाकारपट्टी येथील थलामुथू फटाक्यांच्या युनिटमध्ये घडली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news