

India's first Urban Elevated Expressway UER-2 Dwarka inauguration PM Modi
गुरुग्राम : देशाच्या राजधानीत वाहतूक क्रांती घडवणारा देशातील पहिलाच अर्बन एलिव्हेटेड द्वारका एक्सप्रेसवे आता प्रवाशांसाठी सज्ज झाला असून, येत्या 17 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
या सोबतच अर्बन एक्स्टेन्शन रोड-2 (UER-2) चाही उद्घाटन समारंभ दिल्लीत रोहिणी हेलिपॅडजवळ आयोजित करण्यात आला आहे.
9000 कोटी रुपये खर्चून बांधलेला हा 8-लेन एलिव्हेटेड एक्सप्रेसवे आहे.
29 किमी लांबी असलेल्या या मार्गात 18.9 किमी हरियाणामध्ये व 10.1 किमी दिल्लीमध्ये आहे.
शिव मूर्ती (महिपालपूर, दिल्ली) ते खेरकी दौला टोल (गुरुग्राम) असा संपूर्ण प्रवास
भारतातला पहिला सिंगल-पिलर एलिव्हेटेड एक्सप्रेसवे
IGI विमानतळाजवळील 3.6 किमीचा 8-लेन टनल — देशातील सर्वात रुंद नागरी बोगदा
34 अंडरपास, 31 टनेल्स व 12 रोड ओव्हरब्रिजेस
चार आणि तीन स्तरांची इंटरचेंजेस विविध ठिकाणी
पर्यावरणाच्या दृष्टीने जबाबदारीचे उदाहरण – 1200 झाडांचे पुनर्रोपण
गुरुग्राम टोलपासून IGI टर्मिनल 3 पर्यंतचा प्रवास 10 मिनिटांखाली शक्य.
गुरुग्राम ते दिल्ली प्रवासाचा कालावधी 20-25 मिनिटांवर येणार.
UER-2 द्वारे गुरुग्राम ते सोनीपत फक्त 50 मिनिटांत, तसेच दिल्ली–पनिपत NH-44 सोबत थेट जोडणी.
75.71 किमी लांबीचा, 6-लेनचा महामार्ग.
7716 कोटी रुपये खर्च, दिल्लीतील अलिपूर (NH-44) पासून द्वारका सेक्टर 24 पर्यंतचा विस्तार.
दिल्ली–रोहतक, सोनीपत–गोहाना, गुरुग्राम–सोहना, व दिल्ली–मुंबई एक्सप्रेसवे सोबत थेट जोडणी.
UER-2 मार्गे डिचाऊ कलानजवळून बहादूरगड ते IGI विमानतळाला 8 किमीचा थेट रस्ता.
मुंडका, बवाना, व सोहना मार्गावरील कनेक्टिव्हिटी सुधारली.
दिल्ली-एनसीआरमधील प्रवास, व्यापार व औद्योगिक संधींमध्ये मोठी वाढ अपेक्षित.
NHAI कडून 3000 रुपयांचा वार्षिक पास प्रस्तावित, जो दोन्ही एक्सप्रेसवेसाठी वैध असेल.
गुरुग्राम ते सोनीपत किंवा NH-44 एकरस्ता टोल 45 रुपये प्रस्तावित, अंतिम मान्यता प्रलंबित.
गुरुग्राममधील 50 गावं व 35 हून अधिक सेक्टर्स यांना थेट फायदा.
हरियाणातील 8 जिल्ह्यांना, उदा. सोनीपत, पनिपत, करनाल, अंबाला अधिक जलद जोडणी.
अंतर्गत शहरातील वाहतूक कोंडी कमी होऊन, दिल्ली व एनसीआरमधील जीवनमानात सुधारणा होणार.
या नव्या पायाभूत सुविधांमुळे दिल्ली-एनसीआरमधील नागरिकांना वेगवान, सुलभ, आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. द्वारका एक्सप्रेसवे आणि UER-2 एकत्रितपणे उत्तर भारतातील वाहतूक आणि व्यापार संरचनेत क्रांतिकारी बदल घडवतील.