

FASTag Annual ₹3000 Pass National Highway Toll Offer
नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या खासगी वाहनचालकांसाठी सरकारने आजपासून (15 ऑगस्ट) एक नवा पर्याय उपलब्ध करून दिला आहे — FASTag वार्षिक पास. या नव्या योजनेअंतर्गत, एकदाच 3,000 रुपये भरून वाहनधारक वर्षभरात 200 वेळा टोल क्रॉस करू शकतील, कोणतेही अतिरिक्त पैसे न देता.
सध्या प्रत्येक टोलवर FASTag द्वारे ठराविक शुल्क कापले जाते.
या नव्या पासमुळे दरवेळी पैसे कापले जाणार नाहीत.
एकदाच 3,000 रुपये भरल्यावर 200 वेळा टोल क्रॉस करता येणार.
त्यामुळे एक टोलचा खर्च सुमारे 15 रुपये एवढा बसेल.
सरकारच्या मते, यामुळे एका टोल क्रॉसिंगमागे साधारण 35 रुपयांची बचत होणार आहे.
वारंवार प्रवास करणाऱ्यांना टोलची मोठी बचत होईल. सध्या 200 टोल क्रॉसिंगसाठी 10,000 रुपये लागतात, पण आता हे 3000 रुपयांमध्ये होणार.
नाही. हा पास पूर्णतः ऐच्छिक आहे. तुम्ही आधीप्रमाणे FASTag वापरू शकता.
लागू होणारे महामार्ग: राष्ट्रीय महामार्ग (NH) आणि राष्ट्रीय द्रुतगती मार्ग (NE) जे NHAI व MoRTH यांच्या अधिपत्याखाली आहेत.
उदाहरणे: अहमदाबाद-वडोदरा एक्सप्रेसवे, ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवे, दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे, वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवे.
जिथे पास लागू नसेल:
राज्य महामार्ग
नगरपालिका टोल रोड
खासगी एक्सप्रेसवे: यमुना एक्सप्रेसवे, मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवे
केवळ खासगी (Private) वाहनांसाठी - कार, जीप, व्हॅन. व्यावसायिक वाहनांसाठी (ट्रक, बस, टॅक्सी) नाही.
नाही. तुम्ही वापरत असलेला FASTagच वापरता येईल.
अट: FASTag सक्रीय असावा, व्हेईकल रजिस्ट्रेशन नंबरशी लिंक असावा. केवळ चेसिस नंबरवर रजिस्टर असलेल्या FASTag वर पास लागू होणार नाही.
हा पास NHAI च्या अधिकृत वेबसाइट/अॅप किंवा FASTag जारी करणाऱ्या बँक/एजन्सी कडून खरेदी करता येईल.
काही डिजिटल पेमेंट अॅप्सवर सुद्धा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
नाही. पास पूर्णतः non-transferable आहे. फक्त संबंधित वाहनावरच वापरता येईल. दुसऱ्या वाहनावर वापरल्यास पास रद्द होऊ शकतो व पैसे परत मिळणार नाहीत.
पॉईंट-टू-पॉईंट टोल प्लाझावर एकवेळचा प्रवास = एक क्रॉसिंग.
Closed टोलिंग सिस्टम (जसे की दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे): एक एंट्री आणि एक एक्झिट = एक क्रॉसिंग.
एकंदरीत FASTag वार्षिक पास ही वारंवार राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्यांसाठी एक अत्यंत उपयुक्त योजना आहे. टोलवर वेळ आणि पैसे वाचवण्यासाठी हे उत्तम पर्याय ठरू शकतो. मात्र, ही योजना सध्या केवळ NHAI व MoRTH अंतर्गत महामार्गांपुरती मर्यादित असल्यामुळे, प्रवासापूर्वी मार्ग तपासणे आवश्यक आहे.