हरियाणातील पराभवाने भूपेंद्र हुड्डा यांच्यावर काँग्रेस हायकमांड नाराज

विरोधी पक्षनेतेपदही मिळण्याची शक्यता नाही
bhupendra Hooda News
भूपेंद्र हुड्डा यांच्यावर काँग्रेस हायकमांड नाराजPudhari Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाने काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाला धक्का बसला आहे. यानंतर काँग्रेस हरियाणा प्रदेश कमिटीवर कठोर कारवाई करण्याच्या मनस्थितीत आहे. या निवडणुकीत सर्वाधिकार मिळालेल्या भूपेंद्रसिंह हुड्डा यांच्यावर काँग्रेस हायकमांडप्रचंड नाराज आहे. गेल्या विधानसभा कार्यकाळात त्यांना पक्षाने विरोधी पक्षनेता केले होते. मात्र, यावेळेस त्यांना हे पदही मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यांच्या जागी नव्या नेत्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.

bhupendra Hooda News
फेक नरेटिव्ह पसरविणाऱ्यांना हरियाणा निकालातून उत्तर : खा. डॉ. श्रीकांत शिंदे

गुरुवारी, हरियाणासंदर्भात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी बैठक झाली. या बैठकीला भूपेंद्रसिंह हुडा, हरियाणा प्रदेशाध्यक्ष उदयभान, प्रदेश प्रभारी दीपक बावरिया यांना बोलावण्यात आले नव्हते. या बैठकीत खर्गे यांच्यासह राहुल गांधी, अजय माकन, अशोक गेहलोत, दोन्ही सचिव मनोज चौहान आणि प्रफुल्ल गुडधे पाटील उपस्थित होते. राहुल गांधी यांनी राज्यातील गटबाजीवर नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यांनी काँग्रेसचे निवडणूक निरीक्षक अशोक गेहलोत आणि छाननी समितीचे अध्यक्ष अजय माकन यांचे कौतुक केले. निवडणुकीत ज्या नेत्यांमुळे पक्षाला नुकसान झाले, त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश राहुल गांधी यांनी दिले. काँग्रेस अध्यक्षांनीही या निर्णयाला सहमती दर्शवली असल्याचे सूत्रांनी सांगितले. खर्गे यांनी माकन आणि दोन्ही सचिवांकडून उमेदवार निवडीची प्रक्रिया आणि कोणत्या नेत्याने तिकीट वाटपात कोणत्या उमेदवाराची शिफारस केली याबाबत माहिती घेतली. यासोबतच तिकीट वाटपात कुठे चुका झाल्या, याबाबतही महासचिव आणि सचिवांची मते जाणून घेण्यात आली. त्याचवेळी राहुल गांधींनी अशोक गेहलोत यांना विचारले की, संपूर्ण निवडणूक प्रचारात कोणत्या उणिवा होत्या. कोणत्या नेत्यांच्या वक्तव्यामुळे आणि कामामुळे काँग्रेसचे नुकसान झाले याबाबत त्यांचे स्पष्ट मत विचारले.

bhupendra Hooda News
हरियाणा विधानसभा निवडणुकीतील 'मराठी चेहरा'; कोण आहेत प्रफुल्ल गुडधे- पाटील?

राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची नाराजी पाहता त्याचा ठपका भूपेंद्रसिंह हुड्डा यांच्यावर पडणार हे निश्चित मानले जात आहे. या निवडणुकीत हुड्डा यांना सर्वाधिकार देण्यात आले होते. तिकीट वाटपातही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला गेला. असे असूनही त्याचे परिणाम प्रतिकूल झाले. काँग्रेसच्या सरचिटणीस कुमारी शैलजा आणि रणदीप सुरजेवाला यांच्याविरोधात पावले उचलले जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news