फेक नरेटिव्ह पसरविणाऱ्यांना हरियाणा निकालातून उत्तर : खा. डॉ. श्रीकांत शिंदे

फेक नरेटिव्ह पसरविणाऱ्यांना हरियाणा निकालातून उत्तर : खा. डॉ. श्रीकांत शिंदे
jalna news
फेक नरेटिव्ह पसरविणाऱ्यांना हरियाणा निकालातून उत्तर : खा. डॉ. श्रीकांत शिंदेpudhari photo
Published on
Updated on

जालना, पुढारी वृत्तसेवाः काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत फेक नरेटीव्ह पसरवुन विजय मिळवला. मात्र हरियाणाच्या विधानसभा निवडणुक निकालातुन काँग्रेसच्या फेक नरेटिव्हला मतदारांनी उत्तर दिले असल्याचे मत खासदार डॉ. श्रीकांत शिदे यांनी व्यक्त केले. हरियाणाच्या निकालाचा महाराष्ट्राच्या निकालावर परिणाम होणार असल्याचे ते म्हणाले.

जालना शहरातील एका हॉटेलमधे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम व माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांची प्रमुख उपस्थिीती होती. यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले कि, राजकारणात फेक नरेटीव्ह जास्त दिवस चालत नाही. काँग्रेस देशात जातीय तेढ निर्माण करुन विजय मिळवुन पाहात आहे.

हरियाणाच्या जनतेने मोंदींनी केलेल्या विकास योजनांवर विश्वास ठेवुन तिसऱ्या वेळेस भाजपाला निवडुन दिले. यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले कि, फेक नरेटीव्ह मुळे भाजपाच्या काही जागा कमी झाल्या. काँग्रेस व विरोधी पक्ष फेक नरेटीव्हच्या आधारावर निवडणुक जिंकु पाहात आहे. महाराष्ट्रातही लाडक्या बहिणीसह विविध विकास योजना केंद्र व राज्य सरकारने राबविल्या आहेत. महाराष्ट्रात मागील दोन वर्षात ५२ टक्के परदेशी गुंतवणुक आली आहे.

महाराष्ट्रातील डबल इंजीन सरकारने मोठ्या प्रमाणात कामे केले आहे. जातीय व्देश व फेक नरेटीव्हला या निवडणुकीत जनता थारा देणार नाही. महाराष्ट्रातील जागेबाबतचा निर्णय महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे मुंबईत घेतील. महाराष्ट्रात महायुतीचे उमेदवार निवडुण आणुन पुन्हा महायुती सत्तेत येईल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

jalna news
Shrikant Shinde : इर्शाळवाडीवासियांची पुढल्या वर्षी हक्काच्या घरात दिवाळी: खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आश्वासन

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news