

Kulgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) छावणीला लक्ष्य केले. या छावणीवर अचानक गोळीबार करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात CRPF चे तीन जवान जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कुलगाममधील CRPF च्या बटालियन छावणीला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले. यावेळी परिसरात गोळीबाराचे आवाज ऐकू आले. अचानक झालेल्या या गोळीबारामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या.
या हल्ल्यात तीन CRPF जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून, दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, या हल्ल्यामागे नेमके कोण होते आणि दहशतवादी कोणत्या मार्गाने आले होते, याबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. सुरक्षा यंत्रणांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.