Rise and Fall 2: ‘बॉयफ्रेंडला लव्ह यू म्हणत होती, मी रंगेहाथ पकडलं', माजी मुख्यमंत्र्याच्या मुलानं सांगितलं घटस्फोटामागचं कारण

Tej Pratap Yadav on Divorce from Aishwarya Rai: तेज प्रताप यादव यांनी ‘राइज अँड फॉल 2’ या रिअॅलिटी शोमध्ये पहिली पत्नी ऐश्वर्या राय यांच्यासोबतच्या नात्याबद्दल अनेक दावे केले.
Tej Pratap Yadav on Divorce from Aishwarya Rai
Tej Pratap Yadav on Divorce from Aishwarya RaiPudhari
Published on: 
Updated on: 

Tej Pratap Yadav on Divorce from Aishwarya Rai: बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव यांनी त्यांच्या पहिल्या पत्नी ऐश्वर्या राय यांच्यासोबतच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. ‘राइज अँड फॉल 2’ या रिअॅलिटी शोमध्ये बोलताना त्यांनी आपल्या वैवाहिक आयुष्यातील वादांबद्दल सांगितले. तसेच, ऐश्वर्या राय यांच्यावर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोपही केला. मात्र, हे तेज प्रताप यांचे वैयक्तिक दावे आहेत.

लग्नाच्या तीन महिन्यांतच सुरू झाले होते वाद

तेज प्रताप यादव अलीकडेच ‘राइज अँड फॉल 2’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाले होते. या शोमध्ये त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीही चर्चा झाली. शोमधील एका संवादादरम्यान निहारिका हिने तेज प्रताप यांना त्यांच्या घटस्फोटामागचे कारण विचारले. त्यावर त्यांनी लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाल्याचे सांगितले.

तेज प्रताप यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्यातील भांडणे अनेकदा कुटुंबीयांसमोरही होत असत. त्या काळात ते बिहारचे आरोग्यमंत्री होते. मात्र, घरातील सततच्या वादांमुळे घरी जाण्याची इच्छा होत नसे. कधी मित्राच्या घरी, तर कधी इतर ठिकाणी ते थांबत असल्याचे त्यांनी सांगितले.

तेज प्रताप यांनी असा दावाही केला की, त्यांच्या पत्नीला त्यांचे घराबाहेर जाणे आवडत नव्हते. ते सकाळी पूजा करत असतानाही त्यांना विरोध केला जात असे. दुसरीकडे, त्यांच्या पत्नी रात्री उशिरापर्यंत पार्ट्या करत असल्याचा आरोप त्यांनी केला. आपला आणि ऐश्वर्या यांचा स्वभाव वेगवेगळा होता आणि हे लग्न कुटुंबीयांच्या इच्छेने ठरवण्यात आले होते, असेही त्यांनी सांगितले.

Tej Pratap Yadav on Divorce from Aishwarya Rai
Supreme Court: मेट्रोची ५७ स्थानके बंद ठेवण्यावर सुप्रीम कोर्ट नाराज; केंद्राला दिले महत्त्वाचे निर्देश, कोर्टात नेमकं काय घडलं?

‘ऐश्वर्या बॉयफ्रेंडला लव्ह यू म्हणत होती’

तेज प्रताप यादव यांनी ऐश्वर्या राय यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी ऐश्वर्या यांना एका जुन्या प्रियकरासोबत चॅट करताना पाहिले होते.

तेज प्रताप यांनी सांगितले की, ते एकदा विधानसभेतील काम आटोपून संध्याकाळी घरी परतले होते. त्यावेळी बेडरूममध्ये जात असताना ऐश्वर्या एका तरुणासोबत चॅट करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ती त्या तरुणाला मेसेज आणि हार्ट इमोजी पाठवत असल्याचा दावा त्यांनी केला.

आपण हे सर्व दूरून पाहिले होते, असेही तेज प्रताप यांनी सांगितले. या प्रकरणाशी संबंधित रेकॉर्डिंग आपल्याकडे असून ते न्यायालयात पुरावा म्हणून सादर करता आले असते, असाही दावा त्यांनी केला.

Tej Pratap Yadav on Divorce from Aishwarya Rai
Tanushree Dutta: नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून तनुश्री दत्ता काय म्हणाली? समोर आला व्हिडीओ; 'सध्या माझं...'

अवघ्या सहा महिन्यांत घटस्फोट

तेज प्रताप यादव आणि ऐश्वर्या राय यांचा विवाह २०१८ मध्ये कुटुंबीयांच्या संमतीने झाला होता. ऐश्वर्या राय या बिहारमधील नेते चंद्रिका राय यांच्या कन्या आहेत. मात्र, लग्नानंतर काही महिन्यांतच दोघांमधील मतभेद समोर आले. त्यानंतर हे नाते तुटले आणि घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली. आता ‘राइज अँड फॉल 2’ या शोमध्ये तेज प्रताप यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news