Taranjit Singh Sandhu: दिल्लीचे नवे नायब राज्यपाल तरनजीत सिंग संधूंचे थेट ट्रम्प यांच्याकडून विशेष अभिनंदन; काय आहे नेमकं कारण?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्लीच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल माजी राजदूत तरनजीत सिंग संधू यांचे अभिनंदन केले आहे.
Taranjit Singh Sandhu
Taranjit Singh Sandhufile photo
Published on
Updated on

Taranjit Singh Sandhu

नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्लीच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल माजी राजदूत तरनजीत सिंग संधू यांचे अभिनंदन केले आहे. संधू हे एक 'अनुभवी राजनैतिक अधिकारी' असून त्यांच्या कार्यकाळात भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.

Taranjit Singh Sandhu
US-Israel Iran War: अमेरिका का नरमली?

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संधू यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, "दिल्लीच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल तरनजीत सिंग संधू यांचे मनःपूर्वक अभिनंदन! एक अनुभवी राजनैतिक अधिकारी आणि अमेरिकेतील भारताचे माजी राजदूत म्हणून त्यांनी दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी नेहमीच मोलाचे योगदान दिले आहे." दिल्लीच्या प्रगतीसाठी संधू यांचे नेतृत्व यशस्वी ठरेल, अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.

तरनजीत सिंग संधू यांनी अमेरिकेतील भारताचे राजदूत म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण काळात काम पाहिले आहे. त्यांच्या कार्यकाळात भारत आणि अमेरिका यांच्यात दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारीला नवी दिशा मिळाली. संरक्षण करार आणि आर्थिक गुंतवणुकीच्या क्षेत्रात मोठी प्रगती झाली. तंत्रज्ञान आणि सुरक्षेच्या बाबतीत दोन्ही देशांनी एकत्र पावले उचलली. जागतिक राजकारणाच्या बदलत्या समीकरणांमध्ये संधू यांनी वॉशिंग्टनमध्ये बजावलेली भूमिका अत्यंत प्रभावी मानली जाते.

Taranjit Singh Sandhu
US-Israel Iran War | विजय आमचाच युद्धविरामानंतर दोन्ही देशांचे दावे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news