Tamil Nadu Jailbreak : मध्यरात्री फिल्मी स्टाईल थरार! 'फिट' आल्याचे नाटक केले अन्... कारागृहाची भिंत ओलांडून १७ कैदी पसार!

तामिळनाडूतील थेक्कम्पट्टी कारागृहातील खळबळजनक घटना; शोधमोहिमेत चार कैदी जेरबंद
Tamilnadu jail break 17 prisoners escape
थेक्कम्पट्टी कारागृहातून पसार झालेल्‍या १७ पैकी ४ कैद्यांना पुन्हा ताब्यात घेण्यात आले आहे. Pudhari
Published on: 
Updated on: 

Tamilnadu jail break 17 prisoners escape : तामिळनाडूच्या थेनी जिल्ह्यातील थेक्कम्पट्टी कारागृहातून सोमवारी मध्यरात्री फिल्मी स्टाइल थरार पाहायला मिळाला. १७ कैदी सुरक्षा रक्षकांवर हल्ला करून पसार झाले. या घटनेनंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवून चार कैद्यांना पुन्हा पकडले आहे. दक्षिण विभागाचे पोलीस महानिरीक्षक (IGP) विजयेंद्र बिदारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार कैद्यांना पुन्हा ताब्यात घेण्यात आले आहे. उर्वरित कैद्यांचा शोध घेण्यासाठी १७ विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.

मध्यरात्री फिल्मी स्टाईल थरार!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेक्कम्पट्टी कारागृहातील सर्व १७ कैदी एकाच बराकीत होते. त्यांनी कारागृहातून पलायनाचा कट रचला. अचानक मध्यरात्री एका कैद्याला आजारामुळे फिट (फेफरे) येत असल्याचे सांगण्यात आले. त्याच्या मदतीसाठी कारागृह कर्मचारी बराकीत शिरताच, कैद्यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला आणि तिथून पळ काढला.

Tamilnadu jail break 17 prisoners escape
Koffee With Karan Controversy : 'ट्रोलिंग' प्रकरणी विजय देवरकोंडा- रश्मिका मंदानाच्या मॅनेजरची 'सायबर क्राईम'मध्ये तक्रार

एक कर्मचारी गंभीर जखमी

मध्‍यरात्री अचानक झालेल्‍या हल्ल्यात थेनी जिल्हा कारागृहातील ग्रेड-२ अधिकारी थंगापांडी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जी. विलाक्कू येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ड्युटीवर असलेल्या इतर दोन कारागृह कर्मचाऱ्यांनाही किरकोळ दुखापत झाली आहे.

Tamilnadu jail break 17 prisoners escape
Supreme Court | अधिकृत कागदपत्रे पाहून फ्लॅट घेतलाय; मग फ्लॅटधारकांना शिक्षा देता येणार नाही: सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा

सीमावर्ती जिल्ह्यांत हाय अलर्ट; वाहनांची तपासणी सुरू

या घटनेनंतर मदुराई, दिंडीगुल आणि शेजारील केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्यात पोलिसांना 'हाय अलर्ट'वर ठेवण्यात आले आहे. दिंडीगुलचे पोलीस अधीक्षक (SP) एस. जयकुमार यांनी सांगितले की, सुरक्षेचा उपाय म्हणून जिल्ह्यात १६ ठिकाणी तपासणी नाके (checkposts) उभारण्यात आले आहेत. दिंडीगुल-थेनी महामार्गावर वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. पळून गेलेल्या सर्व कैद्यांचे फोटो जवळच्या पोलीस ठाण्यांत पाठवण्यात आले असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Tamilnadu jail break 17 prisoners escape
Malaria Vaccine : मलेरियाच्या लसीच्या किमतीत ४० टक्क्यांनी कपात, जगभरात आणखी १० लाख चिमुकल्यांना मिळणार सुरक्षा कवच

अत्यंत लज्जास्पद: द्रमुकच्या खासदारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

तुरुंगातून पळून जाण्याच्या या घटनेबाबत, द्रमुकचे (DMK) राज्यसभेतील खासदार पी. विल्सन यांनी 'एक्स' (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी या घटनेला अत्यंत लज्जास्पद असे म्हटले आहे. तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, कोणातरी एकाने या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news